हितेश मूलचंदानी अपहरण, खून प्रकरणात आणखी एक अटक

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनालाइन – अपहरण करून हितेश मूलचंदानी या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका अल्पवयीन मुलाला तब्यात घेतले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो जप्त करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांनी आज (शनिवार) एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आत्तापर्य़ंत चार जणांना अटक केली असून अद्याप दोनजण फरार आहेत.

याप्रकरणामध्ये अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय-२५ रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय-२० रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव), आमिन फिरोज खाने या तिघांना घटनेनंतर अटक करण्यात आली आहे. तर रोहीत किशोर सुखेजा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
हॉटेल समोर लघुशंका करण्यावरून झालेल्या वादातून आरोपींनी हितेशचे अपहरण करून त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाठिमागील बाजूस असलेल्या रस्त्यावर नेले. त्याठिकाणी हितेशच्या डोक्यावर कोयत्याने वार करून आणि गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने हितेशचा जागीच मृत्यू झाला.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अशोक निमगीरे, पोलीस हवालदार थेऊरकर, पोलीस शिपाई बंड, लकडे, भोसले, जाधव, बागसिराज, देशमुख, मुळे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like