ICC World Cup 2019 : सचिन, सौरव गांगुली आणि माझ्यापेक्षाही ‘हिटमॅन’ रोहित सर्वश्रेष्ठ सलामीवीर : वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून या स्पर्धेत त्याने सर्वाधिक शतके झळकावण्याचा देखील विक्रम केला आहे. एका स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम करत त्याने श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा याचा विक्रम मोडीत काढला. कुमार संगकारा याने २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये सलग चार शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. त्याचबरोबर एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील मोडण्याची संधी आहे. आतापर्यंत रोहित शर्मा याने या स्पर्धेत ८ सामन्यांत ६४७ धावा केल्या असून सचिन तेंडुलकर याच्या ६७३ धावांचे रेकॉर्ड मोडण्याची देखील संधी त्याच्याकडे आहे. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये त्याने विक्रमांची रांग लावली असून आणखी कोणते रेकॉर्ड मोडतो याकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागले आहे.

त्याचवेळी भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने रोहित शर्मा याचे कौतुक करताना मोठे विधान केले आहे. त्याने एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले कि, आजच्या काळात रोहित शर्मा हा भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर असून त्याने केलेल्या पराक्रमांकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. याचबरोबर त्याला सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा , वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांच्यात सर्वात यशस्वी आणि १ नंबर सलामीवीर कोण आहे असा प प्रश्न विचारला असता त्याने सचिन तेंडुलकर सर्वात यशस्वी सलामीवीर असल्याचे म्हटले मात्र रोहित शर्मा हा माझ्यापेक्षा आणि सौरव गांगुली याच्यापेक्षा चांगला सलामीवीर असल्याचे मत वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले. रोहित शर्मा याने २०१५ च्या वर्ल्डकपपासून आतापर्यंत २० शतके झळकावली असून मागील एक वर्षात त्याने २००० धावांसह १० शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर सध्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असल्याचे मतदेखील त्याने व्यक्त केले. तसेच रोहित शर्मा त्याच्याजवळ जाऊ शकतो अशी आशादेखील त्याने व्यक्त केली.

दरम्यान, या स्पर्धेत रोहित शर्मा याने आतापर्यंत पाच ‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड जिंकले असून त्याला सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग याच्या सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ अवॉर्ड पुरस्कारांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ