आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टिंगरे नगर येथे लागलेली आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना बाप लेकांनी मारहाण केल्याचा प्रकार रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी पिता पुत्रावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम बबन टिंगरे (विश्रांतवाडी) व सुरज राजाराम टिंगरे (विश्रांतवाडी) अशी पिता पुत्रांची नावे आहेत. याप्रकरणी सुनील देवकर या अग्निशमन दलाच्या जवानाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील देवकर हे टिंगरे नगर परिसरात लागलेली आग विझविण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा नियंत्रण कक्षाकडून टिंगरे नगर परिसरातील सुनील टिंगरे यांच्या बंगल्याजवळ आग लागल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी ते आग विझविण्यासाठी तेथे गेले आणि पाण्याचा मारा करत असतान राजाराम टिंगरे तिथे आले. ओढ्यात कचऱ्याला आग लागली होती. त्यावेळी त्यांनी तुम्हाला येथे कोण बोलवले ते सांगा म्हणत पाण्याचा पाईप ओढण्याचा प्रयत्न करत अंगावर धावून गेल आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांना बोलवून घेतले. त्यानंतर पोलीस येईपर्यंत त्यांनी देवकर यांचा शर्ट पकडून ठेवला आणि त्यांना मारहाण केली. त्यात त्यांच्या शर्टची पाच बटने तुटली. तसेच त्यांना पोटात लाथ मारली. पुढील तपास विश्रांवतवाडी पोलीस करत आहेत. जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये एका लष्करी जवाना.

ह्याही बातम्या वाचा –

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर खा. दिलीप गांधी म्हणतात अजून वेळ गेलेली नाही काय आहे खा. गांधी यांच्या मनात हे वाचा सविस्तर

३५० आधार कार्ड सापडली कचराकुंडीत

‘या’ महिन्यात वरुण चढणार बोहल्यावर ?

‘या’ कंपनीचा एलईडी टीव्ही झाला ₹ ७००० स्वस्त संपूर्ण माहिती वाचा सविस्तर

राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती