Post_Banner_Top

मोशीत तरुणाला मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – व्यवहाराने विकत घेतलेली ‘रिक्षा विकत का घेतली’ म्हणून तरुणाला मारहाण केल्याची घटना मोशी टोलनाका येथे शनिवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजीराव रामराव सरांडे (२१, रा. बागडे वस्ती, ता. खेड) याने फिर्याद दिली आहे.

तर आलिशान अनिस शेख (२२, रा. तळवडे) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव यांनी आलिशान यांच्याकडून रिक्षा विकत घेतली. व्यवहार झाल्यानंतर बाजीराव यांनी रिक्षा त्यांच्यासोबत नेली.

यावरून आलिशान आणि त्याच्या तीन साथीदारांनी बाजीराव आणि त्यांच्या भावाला बोलावून त्यांना ‘रिक्षा का घेऊन गेलास’ असे म्हणत शिवीगाळ केली.तसेच लोखंडी रॉडने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like