घरगुती वादातून दाजीला जबरी मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरगुती वादातून साथीदारांना घेऊन येत दाजीवर मेहुण्याने चाकूने वार करत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. हा प्रकार शिवप्रताप हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी येथे घडला.

याप्रकरणी अभिजीत रणजितसिंग राजपुत (35, रा. शिवप्रताप हौसिंग सोसायटी, पवार नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रश्मी अभिजीत राजपुत (28), अक्षय चतुरसिंग परदेशी (20, दोघेही रा. परदेशी वाडा, देहूगाव) यांच्यासह आणखी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रश्मी अभिजीतची पत्नी आहे. तर अक्षय मेहुणा आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. याच वादातून आरोपी अक्षयने शुक्रवारी फिर्यादी यांच्या घरी येऊन चाकूने कानाजवळ, गालावर वार केले. तसेच त्याच्या साथीदारांनी फायटरने डाव्या डोळ्याजवळ मारून लाकडी दांडक्याने, कुलूपाने मारहाण केली. फिर्यादी यांची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता आरोपी रश्मीने त्यांनाही हाताने मारहाण केली. तपास सांगवी पोलिस करत आहेत.

Loading...
You might also like