तरुणाला बेदम मारहाण, मोटारीची तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी, विठ्ठलनगर येथे तरुणाला बेदम मारहाण करुन मोटारीची तोडफोड करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि.२३) सायंकाळी साडे चारच्या सुमारास  घडली आहे.

याप्रकरणी बाबासाहेब काळुराम जाधव (२७, रा. बालाजीनगर, भोसरी) याने फिर्याद दिली आहे. तर आकाश बळीराम खळगे (२५, रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अमोल गोपीनाथ पंडीत (३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) या दोघाना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास विठ्ठलनगर येथे दोन मित्रांची भांडणे सुरू होती. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी त्या दोघांनीही बाबासाहेब जाधव याला बोलविले. मात्र, जाधव हा दुसऱ्या मित्राची बाजू घेत असल्याचा समज करत दोघांनीही जाधव याची मोटार फोडली. तसेच डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.