एड्स बरा करण्यात संशोधकांना यश

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – एड्स या आजाराविषयी लोकांच्या मनात आजही प्रचंड भीती असल्याचे दिसत आहे. परंतु आता एड्‍स व्हायरसवर मात करण्‍यात मोठे यश आल्याचे समोर आले आहे. लंडनमधील एका एचआयव्ही पाॅझिटीव्ह व्यक्तीला एड्स व्हायरस मुक्त करण्यात यश आले आहे. स्‍टेम सेल प्रत्‍यारोपण माध्‍यमातून त्याला एड्सफ्री करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे ज्याला एड्सची लागण झाली आहे आणि तरी त्यातून जाे सुखरुप बरा झाला आहे असा हा जगातील दुसरा व्यक्ती ठरला आहे.

या रुग्णाला एचआयव्ही झाल्याचे २००३ मध्ये निदान झाले होते. परंतु त्याने मात्र २०१२ मध्ये उपचारास सुरुवात केली. त्याला २०१२ मध्ये Hodgkin lymphoma नावाचा कॅन्‍सर झाला. त्‍यानंतर या आजाराच्या २०१६ मध्ये स्‍टेम सेलच्‍या प्रत्‍यारोपणातून उपचारास सुरुवात झाली. दरम्यान लंडनमधील या रुग्णाचे नाव काय आहे हे मात्र अद्याप प्रसिद्ध झाले नाही असे समजत आहे.

मिळाला अनोखा डोनर
सदर रुग्णाच्या कॅन्सरवर उपचार करतानाच डाॅक्टरांना स्टेम सेलचा एक डोनर मिळाला. या डोनरच्या शरीरात जीन म्यूटेशन झालेले होते. हे जीन म्यूटेशन अतिशय दुर्लभ असे आहे. कॅन्सरवर उपचार करता करता एचआयव्हीवर देखील उपचार करता येतील असे डाॅक्टरांच्या लक्षात आले. जीन म्‍यूटेशन नैसर्गिकरित्‍या एचआयव्‍हीशी लढण्‍यास प्रतिकार शक्‍ती देते. मुख्य म्हणजे जीन म्‍यूटेशन यूरोपच्‍या उत्तरकडील भागात केवळ एक टक्‍के लोकांच्‍या शरीरात आढळतो. लंडमधील यूनिवर्सिटी कॉलेजमधील संशोधक रविंद्र गुप्‍तांच्‍या मते, अशा पद्धतीचे जीन मिळणे असंभव आहे.

१८ महिन्‍यानंतर या रुग्णाच्‍या शरीरात एड्‍सचा व्‍हायरस आढळलेला नाही

स्‍टेम सेल प्रत्‍यारोपण केल्यानंतर लंडनमधील या रुग्णाच्या प्रतिकार शक्तीत कमालीचे बदल होताना दिसून आले. ज्याप्रमाणे डोनरवर एचआयव्‍ही व्‍हायरसचा प्रभाव होत नव्हता त्याप्रमाणेच या रुग्णाच्या शरीरातही एचआयव्‍ही व्‍हायरसचा प्रभाव होत नसल्याचे दिसून आले. यानंतर या रुग्णाने या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी एचआयव्‍हीची औषधे घेण्‍याचे बंद केले. जर एखाद्या एचआयव्हीग्रस्त रुग्णाने एड्सवरील औषधे घेण्याचे बंद केल्यानंतर तीन आठवड्यात एचआयव्‍ही व्‍हायरस शरीरात पुन्‍हा सक्रीय होत असतो. परंतु लंडनच्या या रुग्णाच्याबाबतीत असे काही दिसून आले नाही. औषध बंद केल्‍यापासून १८ महिन्‍यानंतर या रुग्णाच्‍या शरीरात एड्‍सचा व्‍हायरस आढळलेला नाही.

ही माहिती सोमवारी विज्ञात जर्नल ‘नेचर’ मध्‍ये ऑनलाईन प्रकाशित झाली आहे. आता अमेरिकेत होणार्‍या एचआयव्‍ही कॉन्‍फरन्समध्‍ये हा रिपोर्ट सादर केला जाणार आहे.

एड्समुक्त होणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्तीने दिली ही प्रतिक्रिया
दरम्यान एड्सपासून मुक्त होणारा पहिला व्यक्ती हा जर्मन होता. हा बर्लिन रुग्ण नावाने जगभरात प्रसिद्ध झाला होता. त्या व्यक्तीस २०१८ मध्ये एड्स या आजारापासून मुक्त करण्यात आले होते. नंतर काही दिवसांनी टिमोथी ब्राउनी नावाने त्याला प्रसिद्‍धी मिळाली. याबाबत बोलताना ब्राउनी म्हणाला की, “मी या नवीन रुग्‍णाला भेटणार आहे आणि त्‍याची ओळख सार्वजनिक करण्‍यास सांगणार आहे, कारण यातून एचआयव्‍ही ग्रस्‍त लोकांना प्रेरणा मिळणार आहे.