भाड में गया कानून, संजय राऊतांचं बेताल वक्तव्य, पहा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना राजकिय नेत्यांची बेताल वक्तव्ये समोर येत असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चक्क आम्ही कायदा मानत नाही. भाड में गया कानून असं बेताल वक्तव्य केलं आहे. मुंबईतील जाहिर सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. त्यावेळी त्यांचा तोल ढासळला आणि हे वक्तव्य केले.

काय म्हणाले संजय राऊत

निवडणूकीचा माहोल आहे. वेळोवेळी मला आचारसंहिता असल्याची आठवण करून दिली जाते, मनात एक भीती असते की आचारसंहिता आहे. एकतर आम्ही कायदा मानत नाही. कायदा आमच्यासाठी बनविण्यात आला नाही. आम्ही हवा तेव्हा कायदा बदलू शकतो. जे मनात आहे ते बाहेर आलं नाही की श्वास कोंडल्यासारखं होतं असं म्हणत भाड में गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता असं ते म्हणाले.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग आहे का? यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे.