लग्‍नसाठी जन्मपत्रिका जुळवणीपुर्वीच होणार HIV टेस्ट ; सरकार बनवतय नवीन कायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – विवाह ही एक अशी साझेदारी आहे ज्यात दोन जण आपले संपूर्ण जीवन सुख दुःखांत एकत्र राहण्याचे वचन देतात. असे म्हटले जाते की जोड्या वरती बनविल्या जातात आणि आम्ही त्यांना खाली मिळवतो. विवाहासाठी, मुलाचे आणि मुलीचे पालक त्यांच्या आनंदी जीवनासाठी त्यांची कुंडली जुळवतात. पण याचप्रमाणे आता विवाहापूर्वी एचआयव्ही चाचणी सक्तीची होणार आहे. गोवा सरकार विवाहासंबंधी एक महत्वाचा नियम अंमलात आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन नियमानुसार, गोव्यामध्ये कोणीही लग्न करण्यापूर्वी, एचआयव्ही चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.

गोवा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, सरकार या निर्णयावर विचार करीत आहे. यानंतर लवकरच हा कायदा लागू करण्यात येईल. आरोग्य मंत्री म्हणाले, आम्ही गोव्यामध्ये विवाह नोंदणी करण्यापूर्वी जोडप्यांना एचआयव्ही चाचणी अनिवार्य करण्याचा विचार करीत आहोत. हे सध्या अनिवार्य करण्यात आलेले नाही.

या प्रस्तावावर कोर्टाचा विचार देखील घेण्यात येणार आहे. गोवा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की या कायद्याला मंजुरी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या काही विभागांमध्येही याविषयी प्रस्थाव पाठविण्यात आले आहे. चर्चेनंतर, कायदा अंमलात आणण्यासाठी पावले उचलली जातील. त्यांनी सांगितले की विभागांमधून मान्यता मिळाल्यानंतर आम्ही राज्य विधानसभा मान्सूनच्या सत्रात यावर एक कायदा करू. गोवा विधानसभेचे मान्सून सत्र 15 जुलैपासून सुरू होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर