‘हिजडा’ कथेने रचला इतिहास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या काही वर्षांपर्यंत चित्रपट, मालिका, नाटक हीच मनोरंजनाची साधनं होती. पण बदलत्या काळानुसार मनोरंजनाची साधनं देखील बदलली आहेत. आता प्रेक्षक वेबसिरिज, शॉर्ट फिल्म मोठ्या प्रमाणावर पाहू लागले आहेत.

व्हायरस मराठी या यूट्यूब चॅनेलवरच्या संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला १०m व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्यावर लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे.

आठवणींचे कोलाज : प्रिया तेंडुलकर 

मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेनमध्ये भीक मागणारा हिजडा यांची गोष्ट या शॉककथेमध्ये मांडण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’abdd2bf4-bc0f-11e8-9f1f-917b8aeb9cd6′]
तृतीयपंथी व्यक्तींनाही समानतेचा हक्क आहे. याची जाणीव संतोष कोल्हे यांनी त्यांच्या हिजडा या शॉककथेतून समाजाला करुन दिली आहे.

[amazon_link asins=’B072XP1QB7,B0146QJTDC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d918149-bc0f-11e8-ae0e-a5f174868afc’]

अभिनेत्री छाया कदम हिने हिजड्याची भूमिका केली आहे,आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी हिजडा रंगवला होता पण सतत वेगळ्या भूमिकांचं आवाहन स्वीकारणाऱ्या छाया कदम यांनी ही भूमिका समर्थपणे पेलली आहे. अक्षय शिंपी यानं सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका केली आहे.या व्हिडीओची कथा मुकेश माचकर यांची आहे.

You might also like