जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यामागे हिजबुल मुजाहीद्दीनचा हात 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मूला ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिजबुल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. या प्रकरणी हिजबुल दहशतवादी संघटनेचा फारूक अहमद भट उर्फ ओमर याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याने ग्रेनेड हल्ला केला असल्याची कबुली देखील दिली आहे अशी माहिती जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालक मनीष सिन्हा यांनी दिली आहे.

भट हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कुलमर्थ जिल्ह्याचा कमांडर आहे. त्याने अटकेनंतर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जम्मू बस स्थानकावर आज गुरुवारी सकाळी हल्ला करण्यात आला. यात २८ जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ला झाल्यानंतर लगेच पोलीसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला होता.

पोलीस तपासतात अवघ्या काही तासातच हा हल्ल्याचे धागेदोरे समोर आले आणि एका संशयीत व्यक्तीला अटक केली. अटके नंतर त्याने लगेच आपल्या कृत्याची कबुली दिली आहे. या हल्ल्या सारखे आणखी काही ठिकाणी हल्ले करण्याचा या दहशतवादी संघटनेचा कट होता का या बद्दल पोलीस तपास करत असून पोलीसांनी कश्मीर मधील सर्व प्रमुख शहरात शोध मोहीम सुरु केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1103635250322669570