काश्मीरचा ‘बडतर्फ’ DSP दविंदर सिंह बद्दल पोलिसांचा आणखी एक ‘धक्कादायक’ खुलासा !

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील निलंबित उपाधीक्षक दविंदर सिंह यांच्यासोबत अटक करण्यात आलेल्या मुजाहिद्दीनचे स्वयंभू कमांडर नविद बाबू याने त्यांच्यातील संबंधांबाबत माहिती द्यायला सुरुवात केली आहे. तसेच चौकशीदरम्यान त्याने हे देखील सांगितले की तो एका आमदाराच्या संपर्कात देखील होता.

नवीद उर्फ बाबू हा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. एनआयए त्याबाबत चौकशी करत आहे ज्यामध्ये दविंदर सिंह याचा समावेश आहे. 11 जानेवारी रोजी नवीद सह इतर दहशतवाद्यांना खोऱ्यातून बाहेर पाठवण्याच्या तयारीत असलेल्या सिंह यांना अटक करण्यात आली होती.

आमदाराच्या संपर्कात होता दहशतवादी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीद ने दावा केला आहे की तो काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा ठिकाणा बनवण्यासाठी एका आमदाराच्या सतत संपर्कात होता आणि लपण्यासाठी ठिकाण शोधत होता. काश्मीरमध्ये तीन अपेक्षा आमदार आहेत.

आरोपींकडून कित्येक दिवस चौकशी केल्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे पाठविण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की चौकशी दरम्यान, नवीदने बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनमधील आपल्या भूमिकेविषयी सांगितले, सीमेच्या दोन्ही बाजूंच्या अतिरेकी गटाच्या वरच्या अतिरेक्यांशी संपर्क साधण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणून नवीद बनला होता.

चंदिगढमध्ये होणार होता शिफ्ट
नवीदने दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आणि दहशवादाला भूमिगत राहून मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली. नवीदच्या भावाला देखील पंजाब वरून अटक केल्याची माहिती सय्यद इरफान अहमद यांनी दिली. नवीद आपल्या भावाच्या संपर्कात होता आणि थंडीपासून वाचण्यासाठी चंदिगढ येथेच राहण्याची व्यवस्था शोधात होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दविंदर सिंह यांनी दहशतवाद्यांना जम्मूमध्ये केली होती मदत
अधिकऱ्यानी सांगितले की सिंह यांनी गेल्या वर्षी देखील बाबुला जम्मूमध्ये येण्यासाठी आणि आरामात राहण्यासाठी नंतर माघारी परतण्यासाठी देखील मदत केली होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी डोंगराळ भागात नवीद राहत असे आणि थंडीपासून वाचण्यासाठी ठिकाण बदलत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.