COVID-19 : आरोग्य मंत्रालयाकडून ‘कोरोना’ व्हायरससाठी विकसित केलं वेगवान ‘अँटीबॉडी डायग्नोस्टिक किट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. कोरोनावर कोणतेही लस उपलब्ध नसल्याने देशासमोर अनेक पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे लॉकडाऊन आहे. जेणे करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल. परंतु देशात सर्वांची घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी झालेली नाही. या दरम्यान आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या HLL Lifecare Limited या कंपनीने एक रॅपिड अँटीबॉडी डायग्नोस्टिक किट तयार केले आहे. या किट द्वारे रक्ताच्या आधारे मानवी शरीरातील अँटीबॉडी तपासता येतील.

नोवेल कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी भारत एक पाऊल पुढे गेला आहे. या किटद्वारे कोविड – 19 आपल्या शरीरात आहे की नाही किंवा त्याविरुद्ध लढण्यासाठी IgM/IgG अँटीबॉडी आहेत की नाही हे तपासता येईल. रुग्णाच्या रक्तातील प्लाझमा, सिरम किंवा रुग्णाच्या श्वसानातील संसर्ग आणि रक्तातील लक्षण ओळखता येतील. या किटला एनआयव्ही पुणे आणि आयसीएमआरद्वारे मान्यता मिळालेली आहे.

कोरोनावर येणाऱ्या काही आवाहलानुसार काही कोरोनाग्रस्त रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण दिसून येत नाहीत. त्यामुळे हे रुग्ण कोरोनाचे सायलेंट कॅरिअर असू शकतात. अशावेळी हे रक्ताची चाचणी करणारे किट अत्यंत प्रभावी ठरणार आहे. कोरोना झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी दोन प्रकार आहेत. एक म्हणजे घशातील स्वॅबची चाचणी आणि दुसरी चाचणी म्हणजे रक्ताची चाचणी.

काही लोकांना कोरोना होत आहे परंतु त्यांच्यात कोरोनाची लक्षण आढळत नाहीत. याला कारण ठरत आहे ते त्या लोकांमधील प्रतिकार शक्ती. प्रतिकार शक्ती चांगली असलेल्यांच्या शरीरात कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीची निर्मिती होत आहे. असे असले तरी या लोकांना कोरोना झाला नाही हे सिद्ध होत नाही. अशावेळी हे लोक सायलेंट कॅरिअर असू शकतात. ज्याने ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांच्या संपर्कात हे सायलेंट कॅरिअर आल्यास त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सायलेंट कॅरिअर लोकांची ओळख करण्यासाठी आणि कोरोनावर लवकर उपचार व्हावे यासाठी ही किट फायदेशीर ठरेल.

जर्मनी सारख्या देशात देखील अशा प्रकारच्या किटद्वारे लोकांना कोरोना झाला आहे की नाही याची चाचणी होत आहे. त्यानंतर आता देशात देखील याद्वारे कोरोनाग्रस्तांची ओळख पटवणे सोपे होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like