शॉर्ट ड्रेसमध्ये स्पॉट झाली अंबानी खानदानची ‘सून’ श्लोका, सासूसोबत कॅमेऱ्यासमोर दिल्या ‘पोज’  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नीता अंबानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये स्पॉट होत असतात. अनेकदा त्यांचे फोटो सोशलवर व्हायरल होत असतात.

पुन्हा एकदा त्या स्पॉट झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सूनबाई श्लोका मेहतादेखील होत्या.

खास बात अशी की, नीता आणि श्लोका या दोघांनीही मॅचिंग ड्रेस घातला होता. श्लोकाने व्हाईट टॉपसोबत ग्रे कलरचा शॉर्ट स्कर्ट घातला होता. तर नीता अंबानी यांनी व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता. सासू-सून दोघीही कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसून आल्या.

नुकतेच मुकेश अंबानी पूर्ण परिवारासोबत रिलायंस इंडस्ट्री लिमिटेडच्या वार्षिक  सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी पोचले होते. यावेळी मुकेश अंबानींसोबत पत्नी नीता अंबानी, आई कोकिलाबेन यांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या.

वार्षक सर्वसाधारण सभेत मुकेश आणि नीता अंबानी यांची तीनही मुलं ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हेही उपस्थित होते. आकाश अंबानी यांच्या सोबत पत्नी श्लोका मेहताही दिसून आल्या.

याच वर्षी 9 मार्च रोजी आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांनी शाही अंदाजात लग्न केलं होतं. यानंतर हे कपल रोमँसचा नवा चेहरा म्हणून समोर आलं. जेव्हा हे कपल पब्लिकली एकत्र दिसतं तेव्हा सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं.