राहुल गांधींवर अमित शहांचा ‘हल्ला’, म्हणाले – ‘CAA कायदा वाचला नसेल तर ‘इटालियन’मध्ये भाषांतर करून पाठवू का ?’
जोधपूर : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या परिचित शैलीत राजस्थानच्या जोधपूर येथे नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. या वेळी अमित शहा यांनी तीव्र शब्दांत विरोधकांवर हल्ला चढविला. काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांवर अमित शहा यांनी तोफ डागली. ‘CAA कायद्यासंदर्भात आम्ही एक इंचही माघार घेणार नाही, काॅंग्रेस पक्षाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात गैरसमज निर्माण केले आहेत’, असे अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले. अमित शहा पुढे म्हणाले की, ‘राहुल बाबा, जर तुम्ही कायदा वाचला असेल तर त्यावर चर्चा करायला या. जर आपण ते वाचले नसेल तर, मी इटलीयन भाषेमध्ये याचे भाषांतर पाठविण्यासाठी तयार आहे.’
अमित शहा यांच्या भाषणातील वैशिष्ट्य :
1) धर्माच्या आधारे देशाचे विभाजन होऊ नये, काॅंग्रेस पक्षाने धर्माच्या आधारे विभाजन केले. पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, छळाचा बळी पडलेल्या निर्वासितांची कोणालाही चिंता नाही.
2) 56-इंच छाती असणाऱ्या माणसाने धैर्य दाखविले, निर्वासितांच्या मानवी हक्कांची चिंता केली. मी तुम्हाला शाश्वती देऊन सांगतो कि, भारतात आलेल्या निर्वासितांसाठी भारत आपला आहे.
3) मोदी सरकार व्होट बँकचे राजकारण करीत नाही, भारत अल्पसंख्यांकांचा मोठ्या मनाने आदर करतो, अफगाणिस्तानात फक्त 500 अल्पसंख्याक शिल्लक आहेत.
4) काॅंग्रेस नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांनचे पालन केले नाही, परंतु आम्ही करू.
5) हा कायदा लागू झाल्यानंतर दंगली करण्यात आल्या, मला निषेध करणार्यांना सांगायचे आहे, लोकांना दिशाभूल करणे सोपे नाही.
6) भाजप देशव्यापी जनजागृती सुरू करीत आहे, 500 सभा कर कायद्याबद्दल सांगतील.
7) काॅंग्रेसला राष्ट्रीय मुद्द्यांचा विरोध करण्याची सवय लागली, तिहेरी तलाक, कलम 370, राम मंदिर, हवाई हल्ल्याचा विरोध, व्होट बँकेसाठी वीर सावरकरांचा अपमान.
8) ज्यांनी देशाचे तुकडे तुकडे केले त्यांना तुरूंगात टाकले पाहिजे, तुकडे करणारी टोळी देशाचा विभाजन करू इच्छित आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !
- गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
- पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहात ? ‘हे’ 5 उपाय ठरतील फायदेशीर !
- ‘कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ का होतो? जाणून घ्या ९ लक्षणे आणि ६ उपाय
- कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे
- सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा
- कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या