HM Amit Shah Pune Visit | केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येत्या रविवारी (दि. 19 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर (Pune tour) येणार आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता अमित शाह (Amit Shah) पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे (shrimant dagdusheth halwai ganpati) दर्शन घेणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष (Standing Committee Chairman) आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी दिली. (HM Amit Shah Pune Visit)

 

हेमंत रासने म्हणाले, पुणे महापालिकेच्या (PMC) विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे अनावरण, महापालिका हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) भूमिपूजन आणि शहर भाजपच्या (BJP) बूथ समितीच्या कर्यकर्त्यांचा मेळावा अशा विविध कार्यक्रमांसाठी अमित शाह (Amit Shah) पुणे भेटीवर येत आहेत. यावेळी ते गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यापूर्वी दोन वेळा ते सपत्नीक दर्शनाला आले होते. पाच वर्षापूर्वी 5 जून 2016 रोजी पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले होते. (HM Amit Shah Pune Visit)

 

दरम्यान, महापालिकेत होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी बुधवारी (दि.15) दिली. महापालिकेत होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे उपस्थित राहणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

 

Web Title :- HM Amit Shah Pune Visit | union home minister amit shah visit dagdusheth halwai ganpati pune Hemant Rasne

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा