HM Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा तात्पुरता स्थगित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – HM Amit Shah | पुणे महापालिका (Pune Corporation) निवडणुकीचे (PMC Elections) रणशिंग फुकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांच्या 26 नोव्हेबरच्या पुणे दौर्‍यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, हा दौरा आता तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (bjp city president jagdish mulik) यांनी सांगितले.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) हे २६ नोव्हेबर रोजी पुणे व नगर दौर्‍यावर येणार होते. पुण्यातील विविध विकास कामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात येणार होते. अमित शहा यांचा हा दौरा म्हणजे भाजपाची महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

अमित शहा (HM Amit Shah) यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. केंद्रीय सहकारमंत्री म्हणून बारामतीत झालेल्या विकास कामाची पाहणी करण्यासाठी हे निमंत्रण दिले आहे. आताच्या दौर्‍याच्या कार्यक्रमात शहा यांच्या बारामती भेटीचा समावेश नव्हता. सुधारित दौर्‍यात तो असणार का याविषयी चर्चा सुरु आहे.

 

Web Title :- HM Amit Shah | Union Home Minister Amit Shah’s visit to Pune temporarily postponed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ