सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी म्हणून रस्त्यावर होर्डींग ! व्हायरल झाले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे.

आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनंही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रियानं तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना टॅग करत पोस्ट शेअर केली होती आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता तर या प्रकरणी एक वेगळंच चित्र पहायला मिळत आहे.

सध्या सोशलवर काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यात एक होर्डिंग दिसत आहे ज्यावर लिहिलंय की, सुशांतच्या हत्ये प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी. खास बात अशी की, यात सुशांतचा फोटोही दिसत आहे. निवेदक म्हणून रवी तिवारी असं नावही यावर लिहिलं आहे. हे होर्डींग्स दिल्लीच्या रस्त्यावरील असल्याचा दावा सोशलवर केला जात आहे.

खास बात अशी की, सुशांतच्या दिल बेचारा या शेवटच्या सिनेमानंतर असं चित्र दिसत असून हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांनी या होर्डिंगचे फोटो शेअरही केले आहेत.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्याहून जास्त काळ झाला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अद्यापही मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 35 पेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी, बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी, यश राज फिल्म्स कास्टींग डायरेक्टर शानू शर्मा यांच्यासह इतरांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी रेश्मा शेट्टीचीही चौकशी केली. रेश्मा सलमानची खानची एक्स मॅनेजर राहिली आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, यासाठी आता ब्रांदा पोलिसांनी डायरेक्टर महेश भट यांना चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यांचीही चौकशी झाली आहे.