हॉकीपटू बलबीर सिंह सीनियर यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती चिंताजनक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताचे दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे बलबीर सिंह सीनियर यांना हृदयविकाराचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बलबीर सीनिअर यांना मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 96 वर्षीय दिग्गज हॉकी प्लेअर बलबीर सीनिअर यांचा नातू कबीर सिंह भोमिया यांनी माहिती दिली आहे.

कबीर सिंह भोमिया यांनी सांगितले की, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवणार असून  नंतरचप्रकृतीबाबत काही माहिती देणार आहेत. सध्या त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.’ दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी बलबीर सीनिअर लवकर बरे व्हाहे यासाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह बलबीर सीनिअर यांना टॅग करत म्हणाले की, ’बलबीर यांना हार्ट अटॅक आल्याचं ऐकूण अत्यंत दुःख झाले असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

तुम्ही लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो.’ बलबीर सीनियर यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्यामुळे सेक्टर-36 स्थित येथील त्यांच्या घराच्या जवळ असणार्‍या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बलबीर सीनियर यांना रूग्णालयात 108 दिवस घालवल्यानंतर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पीजीआयएमईआर मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. या रूग्णालयात त्यांच्यावर न्युमोनियासाठी उपचार केले जात होते. दरम्यान, बलबीर सिंह सीनिअर त्यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.