ध्वजारोहण करुन सुरु करणार आयुक्तालयाचा कारभार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

गेली कित्येक वर्षे नुसतीच चर्चा, अधिवेशनात लक्षवेधी, शहरातील प्रत्येक कार्यक्रमात घोषणा, प्रस्ताव, फेरप्रस्ताव, ग्रहमंत्रालयाची मंजुरी, खर्चास मंजुरी, अधिसूचना, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पोलीस आयुक्तांची नियुक्ती आणि त्यानंतर अखेरची अधिसूचना निघालेल्या पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार स्वातंत्रदिनी म्हणजे अवघ्या दोन दिवसांनी १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. महापालिकेची चिंचवड येथील आयुक्तालयासाठी मिळालेल्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने तात्पुरत्या कालावधीसाठी सध्याच्या पोलीस उपायुक्त कार्यालयातून आयुक्तालयाचा कारभार चालणार आहे. विशेष म्हणजे उपायुक्त कार्यलयासमोर ध्वजारोहण करुन स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होणार असल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b418e51b-9e51-11e8-af4f-0b77f54db03f’]

पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्याची शक्यता आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, स्मार्तना पाटील, विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, चंद्रकांत अलसटवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहरातील काही मान्यवर उपस्थित असण्याची शक्यता आहे. स्वातंत्र पोलीस आयुक्तालयाची अधिसूचना जारी झाल्यानंतर सर्व प्रथम १७ निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या. त्यानंतर सहाय्यक आयुक्त चंद्रकांत अलसटवार, श्रीधर जाधव यांची, त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी मकरंद रानडे यांची तर काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त म्हणून आर.के. पद्मनाभन यांची नियुक्ती झाली.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती गुन्हेगारी, पुणे पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची शहरात येण्यास टाळाटाळ, शेजारील ग्रामीण परिसरातील गुन्हेगारी यामुळे पिंपरी-चिंचवड कर त्रासले होते. कमी पोलीस संख्या असल्याने पोलिसांनाही गुन्हेगारी मोडीत काढणे शक्य होत नव्हते. यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे यांनी याबाबत वारंवार अधिवेशनात आवाज उठवला.

मुख्यमंत्री तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी भेटी, पाठपुरावा केला. यामुळे शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होत आहे. दोन दिवसांनी आयुक्तलयाचा कारभार सुरु होते आहे खर पण पोलीसांसमोर अनेक आवाहने आ वासून उभी आहेत.

नियुक्ती झाल्यानंतर आयुक्त पद्मनाभन हे शहरात आले आणि खऱ्या अर्थाने कामाला वेग आला. आयुक्तालयासाठी चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिकेच्या शाळेच्या जुन्या इमारतीतून सुरू होणार आहे. मात्र या इमारतीची डागडुजी अद्याप पूर्ण झाली नाही. या ठिकाणचे काम पूर्ण होण्यास किमान दोन महिन्याचा तरी कालावधी लागू शकतो. त्यामुळे आयुक्तालय सुरु करण्यासाठी महापालिकेच्या ऑटो क्लस्टर मध्ये जागा पाहण्यात आली. या ठिकाणी दोन कार्यलये पोलिसांसाठी महापालिकेने दिली आहेत.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1c5b88b-9e51-11e8-aa9f-53b81feb5c78′]

सध्याच्या उपायुक्त कार्यालयातूनच कामकाज सुरू केले जाणार आहे. प्रेमलोक पार्कसह, चिंचवड कामटे चौकातील इमारतीचा एक मजला पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.  पिंपरी पोलीस ठाण्याच्या बाजूला मोकळ्या मैदानात तयार केलेल्या जिमचा वापर कंट्रोल रूम साठी केला जाणार आहे. या ठिकाणी यंत्रणा बसविण्यासाठी दोन पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यानी काम सुरु केले आहे.