यंदाच्या होळीत ‘गजकेसरी’ महासंयोग, ‘या’ 7 राशींसाठी अत्यंत चांगला ‘काळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १० मार्चला होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी होळी खूप खास होणार आहे कारण होळीच्या वेळेस महासंयोग बनत आहे. हा महासंयोग काही जातकांना सुख आणि समृद्धी देईल आणि त्यांच्या मान सन्मान व प्रतिष्ठेत भर टाकणार आहे. मंगळवारी उत्तराफाल्गुनी नक्षत्र होळीच्या दिवशी तयार होत आहे. या दिवशी चंद्र कन्या राशीत असेल आणि गुरु धनु राशीत असेल, ज्यामुळे १० मार्च रोजी गुरु-चंद्राचा गजकेसरी योग बनणार आहे.

गजकेसरी योग इतका प्रबळ आहे की ज्या कोणत्याही राशीवर याचा प्रभाव पडतो, त्या राशीच्या लोकांच्या प्रतिष्ठेमध्ये मोठी वाढ होते. जाणून घेऊन की मंगळवारी असणारी होळी कोणत्या राशीत मंगल करणार.

मेष –

मेष राशीच्या लोकांना कार्यालयामध्ये चांगली उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती देखील खूप चांगली होईल. तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे. तुमच्या विवाहित जीवनातही गोडपणा येणार असून आपण करत असलेल्या कार्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता अधिक आहे.

वृषभ –

होळीचा महासंयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी सर्व प्रकारच्या सुखसोयी आणत आहे. तुमचे कौटुंबिक जीवनही उत्तम राहणार आहे. कार्यालयात काम केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील. या राशीच्या लोकांमध्ये पदोन्नतीचा देखील योग आहे. तुमच्या कामामुळे तुमची प्रतिमा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चांगली असेल. तसेच संपत्ती देखील वाढेल.

मिथुन –

मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती तर चांगली असेल, पण अचानक अनावश्यक खर्च देखील होऊ शकतो. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार. जोडीदाराशी ताळमेळ कमी होऊ शकतो. जे लोक जीवनसाथीचा शोध घेत असतील त्यांना सोबती मिळू शकतो. तसेच कार्यालयात वादविवाद देखील होऊ शकतात, सावध रहा.

कर्क –

कार्य क्षेत्रातील लोकांची खूप धावपळ होऊ शकते. जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत अडकून रहाल आणि तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. आपल्याला अचानक एखाद्या प्रवासास जावे लागेल, यामुळे आपला खर्च वाढेल. आपल्याला आरोग्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

सिंह –

सिंह राशीच्या लोकांना या महासंयोगाचा पूर्ण लाभ होणार आहे. आपल्याला नवीन नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात. आपल्याला काही प्रवास देखील होऊ शकतो परंतु या प्रवासातून आपल्या नफ्यात वाढ होणार आहे. तुम्हाला प्रत्येक निर्णयात तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुम्ही दोघेही एकमेकांच्या अजून जवळ येणार.

कन्या –

कन्या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कार्यालयात गोष्टी सामान्य राहतील, काही विशेष फायदे मिळणार नाहीत. कार्यक्षेत्रात तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. असेही होऊ शकते की कठोर परिश्रमांचे फळ आपल्याला मिळणार नाही परंतु आपण निराश होऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा.

तूळ –

तूळ राशीतील लोकांना कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी लोकही या महिन्यात चांगला नफा कमावतील. जर आपण व्यापारी असाल तर आपला व्यवसाय विस्तारेल. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुम्हाला कामात फायदा होईल. वैवाहिक आयुष्य देखील चांगले राहील.

वृश्चिक –

या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे. तुमच्यातील काही लोक नवीन नोकरीसाठी अर्ज करु शकतात. तुम्ही पैसे कमवाल पण तुमचा खर्चही जास्त होईल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात आपल्याला संयम ठेऊन काम करावे लागेल. कोणतीही योजना अत्यंत विचारपूर्वक करा. जोडीदारासोबत ताळमेळ बनवून ठेवा.

धनु –

धनु राशीच्या लोकांना कार्यालयात अजून काही अधिकार मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. आपल्याला पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग मिळतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना विशेषत: गजकेसरी योगाचा लाभ मिळणार आहे. आपण कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील.

मकर –

मकर राशीचे लोक या महासंयोगाच्या प्रभावाने नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात. आपण कार्यालयामधील कोणतीही जुनी समस्या सोडविण्यास सक्षम असाल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांचा शोध कदाचित संपू शकेल. विवाहित लोक आपल्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवतील. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद राखावा.

कुंभ –

या राशीचे लोक प्रगतीकडे वाटचाल करतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याचे योग्य जुळून येत आहेत. आपल्या कामासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे. कामांच्या संदर्भात बरीच धावपळ करावी लागेल, परंतु त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. अधिकृत भेटींवर जाण्याचा योग येईल, ज्याने आपल्या कामाचा विस्तार होऊ शकतो.

मीन –

जर आपण नोकरी बदलण्याचा प्रयत्न करीत असाल तर आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल. काही लोकांची नोकरीसंबंधीत बदलीची शक्यता आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आपण काही मोठे निर्णय घ्याल परंतु त्यापूर्वी आपण काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात काही चढउतार येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते.