‘या’ होळी साँगच्या शुटींगसाठी लागले होते 4 दिवस, ‘ही’ होती अडचण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या ये जवानी है दीवानी या सिनेमातील बलम पिचकारी हे गाणं खूप चर्चित आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. सिनेमातील हे गाणंही हिट झालं होतं. या गाण्याच्या शुटींग दरम्यान अनेक मजेदार गोष्टी घडल्या होत्या. या गाण्याच्या दरम्यान सर्वांनी एवढी मस्ती केली होती की, या गाण्याची शुटींग 4 दिवस चालली होती. यातील काही मजेदार किस्से आपण जाणून घेणार आहोत.

https://www.instagram.com/p/B8Bp7oznSBc/

या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण या दोघांचंही हे पहिलं होळी साँग होतं. यात आदित्य रॉय कपूरनंही सोबत दिली होती. अयान मुखर्जी या सिनेमाचं डायरेक्शन करत होता. हे गाणं रेमो डिसूजानं कोरियोग्राफ केलं होतं. डान्समध्ये माहिर असणाऱ्या रणबीर कपूरनं तीन ते साडेतीन मिनिटांतच सर्व स्टेप्स शिकून घेतल्या होत्या. जेव्हा रणबीर रेडी होता तेव्हा आदित्य म्हणाला मी अजून रेडी नाही.

अयान मुखर्जीला होळी खूप आवडते. जेव्हा गाण्याची शुटींग सुरू होती तेव्हा त्यानं सर्वांसोबत खूप मस्ती केली. तो अचानकच कोणाला तरी रंग लावायला जायचा. तर कधी कोणाला उचलून पूलमध्ये फेकायचा. या शुटींगवेळी एवढा रंग खेळला गेला की, गाण्याची शुटींग 4 दिवस सुरू होती. फक्त एक सीक्वेंस अपूर्ण राहिल्यानं एक दिवस वाढवावा लागला.

आणखी एक बाब अशी की, शुटींग सुरू असताना कॅमेरा आणि लेंसवर एवढा रंग उडायचा की, शुटींग पुन्हा सुरू करावी लागायची. 31 मे 2014 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर ब्रह्मास्त्र सिनेमात पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं आलिया भट आणि रणवीर कपूर देखील पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहेत.