होळी 2020 : रंगाची उधळण करताना ‘या’ 6 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : होळीच्या सणादिवशी मुंबई, ठाणे आणि राज्याच्या अन्य शहरांमध्ये रंगांची उधळण करण्यात येते आणि एकच जल्लोष असतो. रंगात आणि पाण्यात लोक चिंब भिजलेले असतात. अलीकडे नैसर्गिक रंगाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. तरीपण बाजारात रासायनिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

दिवाळीच्या वेळी फटाक्यांच्यां धुराचा त्रास जसा होतो, तसाच रासायनिक रंगाचाही त्रास होऊ शकतो. काहींची त्वचा नाजूक असल्यामुळे कोरड्या रंगाची देखील अॅलर्जी त्यामुळे ती धूळवडही सुरक्षित नसून हे रंग कित्येक दिवस त्वचेवरून लवकर निघत नसल्याने ते घातक ठरू शकतात. अशावेळी त्वचेची काळजी घ्यायला हवी.

1) रंग खेळताना घ्या ही काळजी

बाजारात येणारे रंगात रसायन असल्याने ज्यांच्या त्वचा खूप संवेदशील असते त्यांनी होळीत रंगाची उधळण करत असताना कान आणि डोळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रंगाचा त्वचेशी होणारा संपर्क टाळण्यासाठी हाताचे शर्ट किंवा टी-शर्ट परिधान करा आणि महिलांनी पूर्ण लेगिंग्ज घाला.

2) भरपूर पाणी प्यावं

भरपूर पाणी पिल्याने शरीराला पाण्याची उणीव भासणार नाही आणि कोणत्याच केमिकल्सचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही.होळी हा सण जणू उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे प्रतीक आहे.रंग खेळण्याच्या नादात डिहायड्रेड होऊ नका.शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.पाणी पिताना रंग तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या.

3) तेलाचा वापर

रंगामध्ये असणाऱ्या हानिकारक रसायनांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी तुमच्या केसांना आणि हातानं-पायांना खोबरेल आणि अन्य कोणतंही तेल लावा. तेलामुळे रंग त्वचेपासून विलग राहील. केसांचा आणि केसांच्या आतील त्वचेचा बचाव करण्यासाठी केसांनाही तेल लावा.

4) लहान मुलांची काळजी घ्या

लहान मूल दंगेखोर असतात पाणी आणि रंग हातात आल्याने मुल पाहिजे तसा त्याचा वापर करतात. पालकांनी दक्षता घेऊनही मुलांच्या नाजूक डोळ्यात रंग गेल्यास इजा होण्याची शक्यता असते. म्हणून डोळ्यात रंग गेल्यास भरपूर पाण्याचे आधारे डोळे धुवावेत. अशा वेळेस डोळे चोळू नये अन्यथा आणखी इजा होऊ शकते.

5) रासायनिक रंगाना फाटा

तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करू शकता. हळदीपासून पिवळा रंग तयार होतो. बिट पासून गडद गुलाबी रंग तयार होतो. मेंदी पावडरच्या सहाय्याने देखील हिरवा रंग तयार करू शकतो. रक्तचंदनापासून लाल रंग तयार होतो. अशा प्रकारच्या रंग बनवण्याच्या कार्यशाळाही पर्यावरण प्रेमी आयोजित करतात. तसेच इंटरनेटवरहि नैसर्गिक रंग बनवण्याची माहिती मिळते. हे रंग रासायनिक रंगांपेक्षा केव्हाही सुरक्षित असून हे रंग वापरण्यास प्राधान्य द्यावे.

6) होळी व हानी

होळीच्या रंगाचं सेलिब्रेशन संपले की मगच अंघोळ करावी. कारण सारखं अंग आणि केस सारखे धुतल्याने तुमचे केस खराब होण्याची शक्यता असते.