Holi 2021 : साता समुद्रापार देखील रंग अन् गुलालाची धूम, होळीची कार्बन कॉपी आहेत ‘हे’ 10 विदेशी सण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Holi 2021 | होळी हा रंगांचा सण आहे जो दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, रंगांचा हा उत्सव फक्त भारतपुरताच मर्यादित आहे असे आपल्याला वाटत असेल तर हा आपला गैरसमज आहे. असे अनेक कलरफुल फेस्टिवल जगभरात साजरे केले जातात, ज्याला होळीची (Holi 2021) कार्बन कॉपी म्हंटले जाऊ शकते.

जाणून घेऊया परदेशात साजरी केल्या जाणाऱ्या 10 अशा सण-उत्सवांबद्दल …

कलरजॅम –
टेक्सासमध्ये ‘कलरजॅम’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी नृत्य आणि गाण्याबरोबरच लोक रंगात मग्न होतात. हा उत्सव अगदी भारताच्या होळीसारखा आहे.

लाइफ इन कलर –
एकदा फ्लोरिडामधील कॉलेजमध्ये कलर पार्टी साजरी करण्यात आली. ज्यानंतर जगभरात ‘लाइफ इन कलर’ या नावाने कलर पार्टी साजरी करण्याचा ट्रेंड सुरू झाला. दरम्यान, कलर पार्टी होलीनेच प्रेरित केली होती.

पोलंडचा ‘अर्सिना’ उत्सव-
होळीप्रमाणेच पोलंडमध्येही ‘अर्सिना’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने लोक एकमेकांवर रंगाची उधळण करतात. जुन्या वैमनस्यास विसरून एकमेकांना मिठी मारतात.

श्रीलंकेची होळी-
श्रीलंकेत होळीचा सण भारताप्रमाणेच साजरा केला जातो. एकमेकांना वेगवेगळे रंग लावून इथले लोक हा सण साजरा करतात.

आफ्रिकेचा ‘ओमेना बोंगा’ उत्सव-
आफ्रिकेच्या काही देशांमध्ये ‘ओमेना बोंगा’ नावाचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव अगदी होलिका दहन प्रमाणेच साजरा केला जातो.या दिवशी वन्य देवताला प्रज्वलित केले जाते. या देवताला ‘प्रोन बोंगा’ म्हणतात. लोक ते पेटवून नाचतात, गातात आणि नवीन पिकाच्या स्वागतात आनंंद साजरा करतात.

चेकोस्लोवाकियामध्ये ‘बलिया कनौसे’ उत्सव –
चेकोस्लोवाकियात ‘बॉलिया कानौसे’ नावाचा सण होळीच्या रूपात साजरा केला जातो. या निमित्ताने लोक एकमेकांना रंग लावतात आणि गाणे गाऊन नाचतात.

होली गार्डन ‘फेस्टिव्हल’-
होलीच्या प्रेरणेने स्पेनच्या इबिजामध्ये’ होली गार्डन फेस्टिवल ‘साजरा करण्यात येतो.

होळी वन-
होळीपासून प्रेरित, केपटाऊनमध्ये ‘होळी वन’ हा सण साजरा केला जातो.

फेस्टिवल ऑफ कलर-
होळी सारखा हा सण हिप्पींसाठी नंदनवनपेक्षा कमी नाही. रंगोत्सव म्हणून साजरा केला जाणाऱ्या या उत्सवात लोक नृत्य करतात आणि गाणे गातात.

ला टोमॅटिनो-
स्पेनमधील ‘ला टोमॅटिनो’ हा पारंपारिक उत्सव होळीपेक्षा कमी नाही. या दिवशी लोक टोमॅटो आणि पााण्याने एकमेकांवर हल्ला करतात. ला टोमॅटिनो दरम्यान स्पेनचे सर्व रस्ते आणि गल्ली लाल राहतात.

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण