Holi 2021 Ideas : केमिकल युक्त रंगाने नव्हे, यावेळी ‘या’ खास उपायांनी साजरी करा होळी, अवलंबा ‘या’ 4 पद्धती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होळीला एकमेकांना रंग लावला जातो, यामुळे होळीच्या अगोदरपासूनच बाजारात रंग विक्री सुरू होते. मात्र काही रंगामध्ये केमिकलचा वापर केला जातो. जो त्वचेसाठी हानिकारक असतो. यावेळी अशा रंगाने होळी खेळण्याऐवजी काही स्पेशल पद्धत अवलंबू शकता. यामुळे होळीची मजासुद्धा वाढेल.

1 फुलांनी साजरी करा होळी –
होळी रंगाचा सण आहे आणि यादिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. केमिकल युक्त रंग टाळण्यासाठी यावेळी रंगाने नव्हे, फुलांनी होळी खेळा. यामुळे कुणालाही इजा होणार नाही.

2 नॅचुरल कलरचा वापर –
स्वयंपाक घरात उपलब्ध हळद, मेहंदी पावडर, चंदन पावडर इत्यादी गोष्टींपासून सहज ऑर्गेनिक कलर बनवता येते.

3 कमीत कमी रंग वापरा –
यावेळी होळीला केवळ एकमेकांना टीका लावा. एकत्र जेवणसुद्धा एन्जॉय करू शकता.

4 बॉलीवुड गाण्यांवर डान्स –
होळी आणखी खास करण्यासाठी आपल्या घराच्या छतावर बॉलीवुड गाण्यांवर डान्ससुद्धा करू शकता. यामुळे सणाची मजा आणखी वाढेल. यासाठी तुम्ही छतावर डिेजेसुद्धा लावू शकता.