Holi 2021 Nail Care Tips : होळीला स्किनसह घ्या नखांची सुद्धा काळजी, अवलंबा ‘हे’ 4 उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Holi 2021 Nail Care Tips : होळी येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. यादिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. हे रंग केमिकल युक्त असल्याने अनेकदा त्वचेचे आणि नखांचे नुकसान होते. आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे केमिकलच्या रंगापासून नखांची काळजी घेऊ शकता.

1 नेल पॉलिश लावून खेळा होळी –
नेल पॉलिश लावून होळी खेळल्यास केमिकलयुक्त रंगांपासून नखांचे नुकसान खुप कमी होईल.

2 नेल पॉलिश करा रिमूव्ह –
नेल पॉलिशच्या वर नेल पॉलिश लावल्याने नखं पिवळी होतात. म्हणून अगोदरचे नेल पॉलिश रिमूव्ह करा.

3 मॉयश्चरायजरचा करा वापर –
होळी खेळण्यापूर्वी नखांना चांगल्या प्रकारे मॉयश्चराईज करा. यामुळे कलरपासून होणारे नुकसान टाळता येते. ओलसरपणा टिकतो.

4 लिंबूचा वापर करा –
नखांच्या देखभालीसाठी लिंबूचा वापर करू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे नेल्सला लवकर स्वच्छ करते.