विसरुन सारे पक्ष भेद, चला रंग रंगुया श्रीहरीच्या…

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – होळी निमित्त आज सगळ्याच राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकञ येत धुळवडीचा आनंद लुटला. नेहमीच एकमेंकावर राजकिय चिखलफेक करत विरोध करणारे आज माञ पर्यावरण पुरक अशा विविध रंगात रंगुन आमचा रंगच वेगळा गाण्याच्या तालावर एकमेंकांना रंग लावत रंग उधळत नाचत थिरकत होते . हे दृश्य पाहून मात्र शहरातील नागरीकांच्या भुवयांच उंचावल्या होत्या.

दुपारी शहरातील मध्यवर्ती भागात गुरुशिष्य स्मारकाजवळ सर्वपक्षीय होळीचे आयोजन भाजप जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी आलेल्या कॉग्रेस, शिवसेना, मनसे, अन्य पक्षाचे कार्यकर्ते यांना विविध रंग लावत गुलालाची उधळण करत आनंद लुटला. यानंतर पर्यावरण पुरक अशा कचऱ्याची होळी पेटवुन स्वच्छ शहर सुंदर शहर धुळे होणारच असा आशावाद व्यक्त केला. होळी भवती प्रदक्षिणा मारत होळी व धुळीवंदनाच्या कार्यक्रमाचा मनमुरादपणे कार्यकर्ते एकञ जमत आणि काही वेळ मतभेद विसरत आनंद द्विगुणीत केला.

यात हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, युवराज पाटील, प्रा.शरद पाटील, अतुल सोनवणे,  भुपेंद्र लहामगे, बापु खलाणे, चंद्रकांत गुजराथी, भिकन वराडे, अमोल धामणे, यशवंत येवलेकर, प्रदीप कर्पे, अमोल मासुळे, संजय वाल्हे, मनोज मोरे, अजित राजपुत, महादेव परदेशी, राजेंद्र अघाव, सुनिल ओगले, मनोज वाघ, चंद्रकांत महाजन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like