पाथरी तालुक्यात लाकडांसोबत पब्जीची होळी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील पाथरी येथील शिक्षक कॉलनी मधील नवयुवक मित्र मंडळाने या वर्षीची होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. तरुण पिढीत हाहाकार माजवणाऱ्या PUBG गेमची होळी यावर्षी साजरी करण्यात आली आहे.

हा एक ऑनलाईन मल्टी प्लेअर गेम असल्यामुळे गेम खेळताना लाईव्ह चॅट करता येते. या गेमच्या माध्यमातून अनोळखी लोकांशी देखील गेम खेळत संवाद साधता येतो. त्यामुळे चोवीस तास कानात हेडफोन्स घालून गेम खेळण्याचं प्रमाण वाढलंय. मुलांबरोबरच मुली देखील हा गेम खेळण्यात अग्रेसर आहेत.

PUBG या गेमने सर्व तरुणांच्या आयुष्यावर मोठा दुष्परिणाम झाला आहे. गेल्या ५-६ दिवसात काही तरुणांना या गेममुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या वर्षी PUBG ची होळी करण्याचे मंडळाने ठरवले. PUBG गेमची प्रेतयात्रा काढली गेली. PUBG गेमचे बॅनर्स होळीत दहन करण्यात आले…

यावेळी नवयुवक मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती.