लासलगाव शहर काँग्रेसच्या वतीने कृषी विधेयकाची होळी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव शहर काँग्रेसच्या वतीने शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर केंद्रीय कृषी विधेयकांची होळी करण्यात आली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून यातून उद्योजकांना खूश करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप या वेळी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते गुणवंत होळकर यांनी केला.

शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ असे, आश्वासन देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले.मात्र आता हमीभाव देण्याची वेळ आली असता त्यापासून दूर पळत कंत्राटी शेतीचा घाट घालत आहे. शेती कॉर्पोरेट कंपन्याच्या हातात देऊ पाहत आहे या मुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे काँग्रेस चे नेते डॉ विकास चांदर यांनी या वेळी सांगितले.

या प्रसंगी गुणवंत होळकर, डॉ. विकास चांदर, सतीश पवार, पंकज,आब्बड, विजय भंडारी, दिनेश जाधव, अजय माठा, मिरान पठाण, सोनू शेख, बिस्मिल्ला शहा, रमजू पठाण, सिराज शेख, समीर पठाण, नहीम पठाण, सलमान पठाण, सूफियान शेख, गणेश शिरसाट आदिं सह काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like