इंदापूरात वीज बीलांची होळी, शासनाने बील माफ न केल्यास तीव्र आंदोलण करणार : हर्षवर्धन पाटील.

इंदापूर – राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लाॅकडाऊन काळात नागरिक व शेतकरी यांना विजबील माफीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबतचा दीलेला शब्द न पाळता, कोणालाही विजबील माफ होणार नसल्याचे जाहीर केल्याने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री तथा भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृृत्वाखाली गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता विद्युत वितरण उपविभाग इंदापूर कार्यालयासमोर, दुटप्पी सरकार, प्रशासन व उर्जामंत्री नितीन राऊत यांचा जाहिर निषेध करून विज बीलांची होळी आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी अ‍ॅड. कृृृृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, भरत शहा, मंगेश पाटील, राजेश जामदार, धनंजय पाटील शकील सय्यद, गोरख शिंदे यांचेसह मोठ्याप्रमाणात भाजप कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की लाॅकडाऊन काळात सर्व व्यवसाय बंद असल्याने विजमीटर रिडींग कमी यायला हवे होते परंतु विजवितरण विभागाकडून सरासरीपेक्षा तीप्पट विजबील आकारणी करून सदर विजबीले भरणे अनिवार्य असल्याचे सुतोवाच उर्जामंत्र्यांनी केल्याने पिचलेल्या व मेटाकुटीला आलेल्या सर्वसामाण्यांचे कंबरडेच मोडण्याचे काम विद्यमान सरकार करत असल्याने अशा सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

ते म्हणाले की वाढीव विजबीले वसुलीसाठी विजवितरणकडुन सक्तीने तगादा लावण्यात येत असुन विद्यमान सरकार हे राज्यातील जनतेला न्याय देण्याऐवजी अन्यायाची भुमीका घेत असुन सदर विजबीलांची पठाणी वसुली तात्काळ थांबविण्याचे आदेश राज्यसरकारने विद्युत वितरण विभागाला द्यावेत अन्यथा पुढील काळात भाजपच्यावतीने तीव्र आंदोलण छेडण्याचा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी निवेदनाद्वारे दीला आहे. यावेळी भाजपाच्या वतीने विद्युत उपकेंद्र इंदापूर याठीकाणी विविध मागण्यांसाठी आंदोलण करण्यात येवुन वाढीव विजबीले जाळुन होळी करण्यात आली. तर मागण्याबाबतचे निवेदन इंदापूर विद्युत वितरण उपविभाग, उपअभियंता रघुनाथ गोफणे व इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.