होळीला कराल ‘हे’ उपाय तर माता लक्ष्मीची निरंतर कृपा होईल, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 25 मार्च 2021 – आता होळीचा सण येणार आहे. या दिवशी लोक रंग उधळून आणि गुलाल लावून एकमेकांना हा सण साजरे करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या या शुभ सणानिमित्त काही खास उपाय केल्यास आपल्या घरात आणि कुटुंबात धन-संपत्ती लाभते व कुटुंबात आनंद मिळेल. पंडित प्रवीण मिश्राकडून जाणून घेऊया, होळी सणाबाबत ..

पंडित प्रवीण मिश्रा सांगतात की, होळीच्या दिवशी सकाळी उठून घराच्या मंदिराची स्वच्छ करुन देवी लक्ष्मीची पूजा करावी. तांदूळ, गुलाबी गुलाल आणि भोग घालण्यासाठी गुलाबी मिठाई, केळी, शेव आदी फळांचा वापर करावा.

देवी लक्ष्मीची पूजा कशी करावी?, पहिला उपाय :
लक्ष्मी देवीची मूर्ती गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. कुमकुमचा टिळक देऊन गुलाल अर्पण करावे. अक्षत म्हणजेच तांदूळ गंगेच्या पाण्यात भिजवून भात द्यावा. लक्ष्मीला दीप लावून आरती करावी. यानंतर देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी आणि या होळीपासून पुढच्या होळीपर्यंत घरात शांती नांदावी आणि आनंदी वातावरण रहावे, अशी प्रार्थना करा, असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.

दुसरा उपाय :
पंडित प्रवीण मिश्रा यांच्या मते, होळीच्या दिवशी गुलाबी हर्बल गुलालाची 11 पाकिटे घ्यावीत. त्यांना गरीब मुलांत विभागून द्यावे. हा उपाय सकाळी केला पाहिजे, असे केल्याने सर्व संकट तुमच्या जीवनातून निघून जाईल. याशिवाय पिचकारी किंवा होळीशी संबंधित साहित्य, खाणेपिणे दान करू शकता. हे आपल्या जीवनाची संपत्ती वाढवेल.

( टीप : वरील माहिती हि केवळ आपल्याला माहित असावी, म्हणून दिलेली आहे. यातून कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवणे, असा हेतू नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, होळी सणाला काय काय केले जाते? किंवा लोकांची त्याबाबत असलेली समज किंवा मानलेल्या कोणत्या प्रथा, रूढी आहेत. याची केवळ आपल्याला माहिती द्यावी…म्हणूनच हि माहिती आहे.)