Holiday Calendar | 2022 मध्ये किती सुट्ट्या? शनिवार-रविवारमध्ये बुडणार 12 हॉलिडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Holiday Calendar | नवीन वर्ष सुरू होण्यास आता केवळ सव्वा महिना बाकी आहे. प्रत्येकाला वाटते की 2022 ने आपल्या सोबत समृद्धी आणावी, सोबतच वाईट काळाचा शेवट होवो. सुट्ट्यांच्या दृष्टीने सुद्धा 2022 अतिशय विशेष असणार आहे. 2021 प्रमाणे 2022 मध्ये सुद्धा एकुण 42 सरकारी सुट्ट्या असतील. या सुट्ट्या कोणत्या? कोणत्या वारी-तारखेला येतील? हे माहित असणे आवश्यक आहे. मित्रांसोबत फिरणे असो किंवा कुटुंबासोबत गावाकडे चक्कर मारायची असेल, सुट्टीचे कॅलेंडर (Holiday Calendar) पाहूनच सर्व ठरवले जाऊ शकते.

 

2022 मध्ये 18 गॅझेटेड हॉलिडे असतील, तर उर्वरित रिस्ट्रिक्टेड हॉलीडे असतील. रिस्ट्रिक्टेड हॉलीडे त्या सुट्ट्या असतात ज्यामध्ये संस्था किंवा कंपनीचा मालकाला वाटले तर कर्मचार्‍यांसाठी ऑफिस उघडू शकतो. परंतु सामान्यपणे या दिवशी कार्यालये बंद राहतात. जसे नवीन वर्ष, वसंत पंचमी, लोहडी, जन्माष्टमी, रक्षाबंधन किंवा गुरु नानक जयंती, सर्व रिस्ट्रिक्टेड हॉलीडेच्या श्रेणीत येतात.

 

2022 मध्ये कोणत्या तारखांना असतील सुट्ट्या

 

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुट्ट्या –

 

1 जानेवारी (नवीन वर्ष), 14 जानेवारी (मकर संक्रांती), 14 जानेवारी (पोंगल), 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 5 फेब्रुवारी (वसंत पंचमी),
15 फेब्रुवारी (हजरत अलींचा वाढदिवस) 16 फेब्रुवारी ( गुरु रविदास जयंती), 19 फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), 26 फेब्रुवारी (महर्षी दयानंद सरस्वती जयंती) आणि 28 फेब्रुवारी (महाशिवरात्री).

 

मार्च-एप्रिलमध्ये सुट्ट्या –

 

17 मार्च (होलिका दहन), 18 मार्च (डोलीयात्रा),  20 मार्च (पारशी नववर्ष), 1 एप्रिल (चैत्र सुखलादी), 13 एप्रिल (बैसाखी),
14 एप्रिल (महावीर जयंती), 15 एप्रिल (गुड फ्रायडे), 17 एप्रिल (इस्टर) आणि 29 एप्रिल (जमात-उल-विदा).

 

मे ते ऑगस्ट सुट्ट्या –

 

7 मे (रवींद्रनाथ जन्मदिवस), 15 मे (बुद्ध पौर्णिमा), 30 जून (रथयात्रा), 30 जुलै (मोहरम-आशुरा), 11 ऑगस्ट (रक्षा बंधन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन),
ऑगस्ट 18 (जन्माष्टमी) आणि 30 ऑगस्ट (गणेश चतुर्थी-विनायक चतुर्थी).

 

सप्टेंबर ते डिसेंबर –

 

7 सप्टेंबर (ओणम), 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), 4 ऑक्टोबर (दसरा), 8 ऑक्टोबर (मिलाद उन-नबी), 9 ऑक्टोबर (महर्षी वाल्मिकी जयंती), 24 ऑक्टोबर (नरक चतुर्दशी) ,
24 ऑक्टोबर (दीपावली), 25 ऑक्टोबर (गोवर्धन पूजा), 26 ऑक्टोबर (भाऊबीज), 30 ऑक्टोबर (छठ पूजा), 24 नोव्हेंबर (गुरू तेग बहादूर शहीद दिन) आणि 25 डिसेंबर (ख्रिसमस)

 

शनिवार-रविवारमुळे बुडाल्या या सुट्ट्या

 

शनिवार-रविवारच्या दिवशी जर एखादा सण आला तर समजा की तुमची एक सुट्टी बुडाली.
हाच सण जर एखाद्या कामाच्या दिवशी दिवशी आला तर एक सुट्टी वाढते. 2022 च्या कॅलेंडरवर नजर टाकली तर यावेळी सुद्धा अनेक सुट्ट्या शनिवार-रविवारमुळे बुडाल्या आहेत. (Holiday Calendar)

 

2022 ची सुरुवातच शनिवारच्या दिवसाने होत आहे. म्हणजे शनिवारी नवीन वर्ष सुरूहोत असल्याने तुमच्या एका सुटीचे नुकसान होईल.
फेब्रुवारीत 5 तारीखेला वसंत पंचमी आणि 26 फेब्रुवारीला दयानंद सरस्वती जयंती आहे. या दोन्ही तारखा शनिवारी आल्याने दोन सुट्ट्यांचे नुकसान होईल.

 

नंतर रविवार, 20 मार्चला पारशी नववर्ष आहे. येथेही तुमची एक सुटी खराब होईल. 17 एप्रिलला इस्टर आहे आणि या दिवशी रविवार आहे.
यानंतर 15 मे या दिवशी सुद्धा रविवार आहे. शनिवार, 30 जुलैला मोहरमची सुट्टी बुडणार आहे.

 

यानंतर ऑक्टोबरमध्ये लागोपाठ चार सुट्ट्या खराब होतील. 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), 9 ऑक्टोबर (महर्षी वाल्मिकी जयंती)
आणि 30ऑक्टोबरला (छठ पूजा) आहे आणि हे सर्व सण शनिवारी येत आहेत.

 

तर 8 ऑक्टोबरला मिलाद उन-नबी आहे आणि या दिवशी रविवार आहे. वर्षाच्या शेवटचा महिना डिसेंबरमध्ये सुद्धा एक सुटी बुडणार आहे.
रविवार, 24 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी असेल. अशाप्रकारे संपूर्ण वर्षात एकुण 12 सुट्ट्यांचे नुकसान होईल.

 

Web Title : Holiday Calendar | holiday calendar of india 2022 gazetted holidays festivals 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Senior Citizen Saving Scheme | बचत योजनांमधून मिळत असेल लाखो रुपयांचे व्याज, तर जाणून घ्या केव्हा आणि कसे वाचू शकता टॅक्स कपातीपासून

Bhumi Pednekar | भूमी पेडणेकरच्या ‘या’ मोहक फोटोंमुळे चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील चोरीला गेलेले ‘स्पिकर’ 18 लाखांचे; बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू