‘बियर-बार’मध्ये एकदम ‘ओके’ झाल्यानंतर टेबलवर आलं ‘बील’, पाहूनच उडाली ‘भंबेरी’ अन् पुढं झालं ‘असं’ !

स्पेन : वृत्तसंस्था – दारूच्या नशेत कोण काय करेल याचा अंदाज लावणे तसं कठीणच आहे. कारण नशेत हे काही अतरंगी आणि अशा काही गोष्टी करतात ते त्यांच्याही लक्षात येत नसते. असा काहीचा किस्सा स्पेनमध्ये घडला आहे. स्पेनमध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने दारूच्या नशेत तब्बल ५४ हजारांची दारू ऑर्डर केली मात्र जेव्हा बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्याने थेट हॉटेल मालकाची माफी मागत पैसे नसल्याचे सांगितले. मात्र पोलीसांना बोलवल्यानंतर या पर्यटकाला अटक करण्यात आली आहे.

स्पेन येथील ईबीजा या आयलंडमध्ये एका ४२ वर्षीय ब्रिटिश पर्यटकाने एका हॉटेलमध्ये जाऊन दाबुन जेवण केले आणि दारू पिला. सगळं झाल्यावर हॉटेलवाल्यांनी त्याला बील आणून दिले. या बिलाचा आकडा पाहुन त्याची दारूची नशाच उतरली. त्याच्या एकट्याचे बिल तब्बल ६८ हजार रुपये आले होते. ते त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने हॉटेल मालकाला पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांना बोलावून पर्यटकास पोलीसांच्या हवाली केले.

दरम्यान, तेथील न्यायालयाने या व्यक्तीला ४ महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. तसंच या व्यक्तीने त्या दरम्यान पैसे देऊन आपली सुटका करून घेऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त