अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी : जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर कर्जत श्रीगोंदा नेवासा या चार तालुक्यातील काही गावांमधील प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयांना उद्या बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज याबाबतचा आदेश काढला आहे.

प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र, मुंबई यांनी मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. नांदूर मधमेश्वर बंधा-यातून गोदावरी नदीपात्रात 62 हजार, 737 क्युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच भिमा नदीस दौंड पूल येथे 2,09,431 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरी आणि भिमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होवून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे गोदावरी व पुणे जिल्ह्यातील धरणांद्वारे भीमा नदीस सोडलेल्या
विसर्गामुळे वा अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होऊ नये, याकरीता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील काही शाळांना उद्या सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

सुट्ट्या जाहीर केलेली गावे पुढीलप्रमाणे :
श्रीरामपूर : कमालपूर, नायगाव, नाऊर, रामपूर, गोवर्धनपूर, सराला, महांकाळ वडगांव, खानापुर, मांडवे, कठीत खु. कडीत बु., कुराणपूर, फात्याबाद व भामाठाण.

नेवासा: सुरेगांव, भालगाव, उस्थळ खालसा, जैनपूर व घोगरगाव, गोधेगांव व वाशिम टोका.
श्रीगोंदा: जुनी वांगदरी, गजर मोहरकर वस्ती, मदनेवाडी, आर्वी, आर्वी पुनर्वसन, अनगरे, निमगाव
खलू, कौठा, गार, विकासयाडी , सांगवी गावठाण.

कर्जत : शिंपोरे नवे, शिंपोरे जुने, खेड, भांबोरा, सिद्धटेक, दुधोडी, जलालपूर, गणेशवाडी, बाभुळगांव दुमाला

आरोग्यविषयक वृत्त –