home page top 1

‘एनाबेल कम्स होम’ चित्रपट पाहताना भितीने ७७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

थायलंड : वृत्तसंस्था – हॉलीवूडचा हॉरर चित्रपट ‘एनाबेल कम्स होम’ जगभरात गाजत आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. मात्र या चित्रपटामुळे एका ७७ वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत. थायलंडमधील बर्नार्ड चैनिंग असं या व्यक्तीचे नाव आहे.

चैनिंग हे एक ब्रिटिश नागरिक आहेत, ते सुट्ट्यांसाठी थायलंडला गेले होते. तेथे त्यांनी चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला. तेव्हा त्यांनी एनाबेल कम्स होम हा चित्रपट पाहिला. चित्रपट संपल्यानंतर जेव्हा थिएटरच्या लाईट लागल्या तेव्हा त्यांच्या शेजारील महिलेला ते मृतावस्थेत दिसले. त्यानंतर त्या महिलेने घाबरून कांगावा केला. तेव्हा आपतकाली सेवा केंद्रांना संपर्क केला.

स्थानिक पोलीसांनी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. चित्रपटादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र हे कोणाच्याच लक्षात आले नाही. ज्या महिलेने त्यांना पाहिले त्या सध्या घाबरलेल्या आहेत. तर बर्नार्ड यांना कोणता आजार होता की त्यांचा मृत्यू हा भितीने झाला, याचा तपास पोलीस करत आहे.

दरम्यान, घडलेल्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. चित्रपट पाहताना या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची चर्चा होत आहे. ज्या चित्रपटगृहात या व्यक्तीचा मृत्यू झाला तेथील कर्मचाऱ्यांमध्येही भिती दिसत आहे. अशाच प्रकारची घटना २०१६मध्ये आंध्र प्रदेशमध्ये घडली होती. तेव्हा कॉनज्युरिंग -२ हा सिनेमा पाहताना ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

Loading...
You might also like