‘आमच्याशी त्यांची तुलना करता येणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगातली सर्वात सुंदर अभिनेता म्हणून ब्रॅड पिटला ओळखले जाते. केवळ सुंदर दिसतो म्हणून त्याची ओळख नाही तर त्याची अभिनयावरसुद्धा उत्तम पकड आहे. ब्रॅड पिटनं बॉलीवूडच्या प्रसिध्द अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दल दोन शब्द कौतूकाचे बोलले होते. ते शब्द जेव्हा सोशल मीडियात पसरले तेव्हा त्या जोडप्याला प्रचंड आनंद झाला. आता चक्क ब्रॅड पिटच आपले कौतूक करतो आहे तिथे काय बोलावं असा प्रश्न त्यांना कदाचित पडला असावा. सैफ अली खान आणि करिना कपूर ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील प्रचंड लोकप्रिय कपल मानले जाते.

सैफ आणि करिना हे त्यांच्या प्रोफेशनल गोष्टींपेक्षा त्यांच्या पर्सनल गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. आणि एक खास बात अशी कि, सैफ आणि करिनाची तुलना ही नेहमी ब्रॅड पिट आणि अँजेलिनाशी करण्यात येते. थोडक्यात त्यांना हॉलीवूडचे ब्रॅड आणि अँजेलिना म्हणले जाते. मात्र एका मुलाखती दरम्यान ब्रॅडनं त्यांच्याविषयी कौतूक केले आहे. ब्रॅड जे म्हणाला त्यानंतर सैफ करिनाच्या फॅन्सकडून त्यांना धन्यवाद देण्यात आले.

आता ब्रॅड आणि अँजेलिना यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटामुळे त्यांचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. आपल्याला आवडणारे कलाकार असा टोकाचा निर्णय घेतील याची कल्पना त्या चाहत्यांना नव्हती. एका मुलाखतीत ब्रॅडनं सैफ करिनाविषयी सांगितले होते की, मला खूप आनंद होतो आहे की ते दोघे लग्न करत आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जेव्हा ब्रॅडला असा एक प्रश्न विचारण्यात आला की, त्या दोघांना तुमच्याशी कंपेअर करता येईल का, तेव्हा ब्रॅडनं उत्तर दिलं कि, त्यांची जोडी खूप सुंदर आहे. आमच्याशी त्यांची तुलना करता येणार नाही. मला वाटत नाही की त्यांची तुलना आमच्याशी व्हावी.

टशन या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी सैफ आणि करिना एकमेकांच्या प्रेमात पड़ले होते. त्यानंतर ४ वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ते २०१२ साली विवाहबंधनात अडकले. आता त्यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली असून सैफ आणि करीना यांना दोन मुले आहेत. सैफचे अगोदर अमृत सिंह हिच्याशी लग्न झाले होते.