‘ग्रॅमी अवॉर्ड’ विजेते हॉलिवूड अभिनेते ब्रायन डेनेहे यांचं 81 व्या वर्षी निधन !

पोलिसनामा ऑनलाइन –हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ब्रायन डेनेहे यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हॉलिवूड सिनेमात त्यांनी खूप नाव कमावलं आहे. ते 81 वर्षांचे होते. त्यांनी सादर केलेले स्टेज प्लेदेखील चाहत्यांना खूप आवडले आहेत.

कनेटीकटच्या न्यू हेवनमध्ये बुधवारी(दि15 एप्रिल) रात्री ब्रायन डेनेह यांचं निधन झालं. त्यांची मुलगी एलिजाबेथ डेनेह हिनं त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. ट्विटरवर ट्विट करत एलिजाबेथ म्हणते, “जड अंत:करणानं सांगावं लागत आहे की, माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. नैसर्गिक कारणानं त्यांचा मृत्यू झाला आहे. यात कोरोना व्हायरसची कोणतीही भूमिका नाही. आपल्या बेमिसाल आयुष्य, दयाळुपणा आणि एका चांगलं मन असणारे एक उत्तम वडिल, आजोबा असलेले ब्रायन यांना त्यांनी पत्नी कुटुंब आणि मित्र नेहमीच खूप मिस करतील.”

ब्रायनच्या कामाचे दीवाने होते लोक

एक सुंदर फिजीक, मजबूत आवाज आणि पडद्यावर प्रत्येक रोल चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी ब्रायन खूप फेमस होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये दोन टोनी अवॉर्ड्स आणि एक ग्रॅमी अवॉर्ड मिळवला होता. सोबतच त्यांना 6 एमी अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. 2010 साली त्यांनी अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेमची सुरुवात केली होती.

ब्रायन डेनेहे एनबीसीचा शो ब्लॅकलिस्टमध्ये ते शेवटचे दिसले आहेत. यातील अॅक्ट्रेस मेगन बून हिनंही त्यांना सोशलवर श्रद्धांजली वाहिली आहे. ब्रायन यांनी फर्स्ट ब्लड, ककून, टू कॅच अ किलर, ग्लॅडिएटर सोबतच जवळपास 40 सिनेमात काम केलं आहे.