सर्जरी करून पुरुष बनली ‘ही’ प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेत्री, 6 पॅक अ‍ॅब्समध्ये शेयर केले छायाचित्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलीवुडची सुपरस्टार ट्रान्सजेंडर अभिनेत्री एलेन पेजने आपल्या सर्जरीनंतर सिक्स पॅक अ‍ॅब्ज्मध्ये फोटो शेयर केला आहे. जूनो आणि इन्सेप्शनसारख्या सुपरहिट चित्रपटातून काम केलेली एलन आता एलट पेजच्या नावाने ओळखली जाते. एलटने सप्टेंबर 2020 मध्ये एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सांगितले की ती एक ट्रान्सजेंडर आहे.

ओपेरा विन्फ्रेसोबत इंटरव्ह्यूमध्ये एलटने म्हटले होते की, तिचे बालपण सामान्य होते, परंतु टीनेज पाहता आपल्या शरीरात बदल पाहून ती खुप अस्वस्थ राहू लागली होती. त्या काळात एलट टॉमबॉय सारखी राहत होती परंतु जसजसे तिचे करियर हॉलीवुडमध्ये उसळी घेत होते, ती आपल्या पर्सनल लाईफमध्ये तेवढीच जास्त अस्वस्थ होत होती.

तिने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले, 2007 मध्ये जूनो चित्रपट प्रमोट करण्याच्या दरम्यान ऑस्करच्या रेड कारपेटवर मी एक ड्रेस घातला होता परंतु मी माझेच फोटो पाहू शकत नव्हते. याच्या काही वर्षानंतर इन्सेप्शनच्या प्रीमियर दरम्यान सुद्धा मी काही ड्रेस घातले होते परंतु मला पॅनिक अटॅक येऊ लागले होते आणि आफ्टर पार्टीनंतर खुप घाबरल्यासारखे होत होते.

पेजने म्हटले की, महिलांच्या ड्रेसमध्ये मला अजिबात आरामदायक वाटत नव्हते. जेव्हा माझी सर्जरी झाली तेव्हा मला असे वाटले की, जसे स्वताला पुन्हा एकदा मिळवले आहे. जेव्हा मी तरूण होते, माझा सतत मानसिक संघर्ष सुरू असायचा. यामुळे मी ट्रान्सजेंडर लोकांचा संघर्ष समजू शकते आणि मी त्यांना माझे पूर्ण समर्थन देते.

पेजने 2014 मध्ये म्हटले होते की, ती लेस्बियन आहे आणि तिने कॅनडाची डान्सर एम्मा पोर्टरसोबत 2018 मध्ये विवाह केला होता मात्र, 2021 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. पेजने डिसेंबर 2020 मध्ये इंस्टाग्रामवर घोषणा केली होती की, ती ट्रान्सजेंडर आहे आणि सर्जरी करून घेतली आहे.