काय सांगता ! होय, ‘या’ अभिनेत्रीनं केलं पाचवं लग्न, नवा नवरा चक्क 72 वर्षांचा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बेवॉच फेम अभिनेत्री पामेला अँडरसन हिनं पाचव्यांदा विवाह केला आहे. हॉलिवूडमधील निर्माते जॉन पीटर्स आणि पामेला यांच्या डेटींगच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. अखेर ही जोडी आता विवाहबद्ध झाली आहे. बॅटमॅन या प्रसिद्ध सिनेमाची निर्मिती जॉननं केली आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जॉन आणि पामेलानं मालिबू बीचवर(Malibu Beach) एका खासगी कार्यक्रमात लग्न केल्याची माहिती आहे.

प्रेमात बुडालेल्या पामेलानं एका मुलाखतीत बोलताना त्यांच्यावरील प्रेमाबद्दल सांगितलं होतं. पामेला म्हणाली होती की, “कोणीही तुलना करू शकत नाही एवढं माझं जॉनवर प्रेम आहे.” जॉनला हॉलिवूडचा ओरिजिनल बॅड बॉय म्हणत पामेलानं त्याच्यासाठी एक कविताही लिहली होती. द ओरिजिनल बॅड बॉय ऑफ हॉलिवूड असं या कवितेचं नाव होतं.

पामेलाच्या खासगी आयुष्याबद्दल आणि लग्नाबद्दल बोलायचं झालं तर तिनं पहिलं लग्न संगीतकार टॉमी ली सोबत केलं आहे. तीन वर्षांनी दोघं वेगळे झाले. यानंतर तिनं दुसरं लग्न निर्माता रिक सोलोमन, तिसरं लग्न तिनं पुन्हा एकदा रिकसोबतच केलं. दोघांचा घटस्फोट झाला आणि दोघं पुन्हा विवाहबद्ध झाले. हे लग्न जास्त वेळ टिकलं नाही. रिकीनंतर ती सॉकर स्टार आदिल रामी सोबत विवाहबद्ध झाली. हे तिथं चौथं लग्न होतं. दोघे फ्रान्सला वास्तव्यास होते. परंतु हे लग्न जास्त काळ टिकलं नाही.

View this post on Instagram

🇨🇦 Soft tender Blushing Open

A post shared by The Pamela Anderson Foundation (@pamelaanderson) on

बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्येही तिला काही दिवसांसाठी बोलावण्यात आलं होतं. तिनं चार दिवसांसाठी 2 कोटी मानधन घेतल्याचं समजत आहे. पामेला सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणूनही तिची खूप चर्चा झाली. मुख्य म्हणजे तिच्या येण्यानं शोचा टीआरपी देखील वाढला होता.

 

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like