Coronavirus : हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री सोफिया माइल्सच्या वडिलांचं ‘कोरोना’मुळं निधन

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इटली, अमेरिका, चीन आणि इराण या देशांमध्ये अनेक लोकांनी जीव गमावला आहे. त्यातच आता प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्रीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ट्रान्सफर्मर्स आणि मॅन्सफिल्ड पार्क या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री सोफिया माइल्स हिच्या वडिलांचे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे निधन झाले आहे. त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाची बातमी सांगितली.

सोफिया माइल्स यांनी सोशल मीडियावर, माझ्या वडिलांचे काही तासांपूर्वीच निधन झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. पीटर माइल्स यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. वडिलांच्या निधनांची माहिती देताच तिचे सांत्वन कऱणारे मेसेज अनेक हॉलिवूड कलाकारांनी आणि मान्यवरांनी केले आहेत.

याआधी सोफीने ट्विटरवर वडील आणि भावासोबत एक फोटो शेअर केला होता. माझे वडील, भाऊ आणि मी. एक आठवणीतला फोटो शेअर केला होता. वडिलांवर उपचार सुरु असतानाही एक फोटो शेअर केला होता. त्यात वड़िलांच्या शेजारी मास्क आणि ग्लोव्हज घालून ती उभा असलेली दिसून आली.कोरोना व्हायरसच्या धास्तीने अनेक हॉलिवूड कलाकारांनी टेस्ट करून घेतली आहे. यामध्ये अ‍ॅक्टर टॉम हॅक्स आणि त्याची पत्नी, अ‍ॅक्ट्रेस रिटा विल्सन, एडरिस एल्बा, राशेल मॅथ्यू यांचा समावेश आहे. भारतात बॉलिवूड अभिनेत्री कनिका कपूरला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तिच्यावर लखनऊमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 13 हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.