बराक ओबामा यांनी ‘या’ अभिनेत्याला दिली बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारण्याची परवानगी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी सांगितलं की, त्यांच्या आयुष्यावर भविष्यात बनणाऱ्या सिनेमात रॅपर ड्रेक (Drake) यांना त्यांची भूमिका साकारण्याची परवानगी असेल. ग्रॅमी अवॉर्ड विनर ड्रेक यांनी 2010 साली एखाद्या सिनेमात ओबामा यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती.

एका मुलाखतीत बोलताना ओबामा म्हणाले, असं वाटतं ड्रेक काहीही करण्यासाठी सक्षम आहेत. ते प्रतिभावान आहेत. जर वेळ आली तर ड्रेक तयार आहेत. पडद्यावर ओबामांची भूमिका साकारण्यासाठी ड्रेक यांना ओबामांच्या मुलींचंही समर्थन आहे.

ओबामा म्हणाले की, सर्वांत महत्त्वाची बाब अशी आहे की, ड्रेकला त्यांच्या घरातील सदस्यांचीही मंजुरी आहे. त्यांच्या मुली मालिया (Malia Ann Obama) आणि साशा (Sasha Obama) यांचीही काही हरकत नाही.

2010 साली दिलेल्या एका मुलाखतीत ड्रेक म्हणाले होते की, त्यांना आशा आहे की, लवकरच कुणी ओबामा यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवेल. जेणेकरून त्या सिनेमात ते ओबामांची भूमिका साकारतील.

You might also like