खळबळजनक ! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीचा आरोप, कॉलेज जीवनात ड्रग देवुन केलं शारिरीक शोषण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अलीकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. कॉलेजच्या काळात तिच्यावर एक भयंकर घटना घडल्याचे तिने सांगितले. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, जेव्हा ती न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत होती, तेव्हा कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात तिच्यावर शारीरिक अत्याचार केला जात असे.
Camila-Mendes
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून नेटफ्लिक्स मालिकेत रिव्हरडेलमध्ये दिसणारी अभिनेत्री कॅमिला मेंडेस आहे. कॅमिला मेंडेसने महिलांच्या आरोग्य मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आणखी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार, या अभिनेत्रीने कॉलेजच्या जुन्या दिवसांची आठवण सांगितली आहे. ती म्हणाली की, ‘कॉलेजमधील पहिले वर्ष खूप कठीण होते. मला खूप वाईट अनुभव आले आहेत. एका व्यक्तीने मला ड्रग्ज देऊन शारीरिक शोषण केले ‘.

या प्रकरणात फारशी माहिती न देता ती म्हणाली की, तेव्हापासून तिने स्वत: ला सुरक्षित बनविण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर तिने तिच्या पाठीवर टॅटू काढला. या टॅटूमध्ये लिहले होते की, ‘to build a home’. कॅमिला म्हणाली की, हा टॅटू आठवण करुन देतो की, मला आपला आजुबाजुचा परिसर बळकट करायचा आहे. कॅमिला म्हणाली की, तिला तिच्या चाहत्यांसाठी रोल मॉडेल बनायचे आहे.

ती म्हणते की, ‘चांगले आरोग्य अधिक महत्वाचे आहे. आपण आपल्या शरीरासाठी, आपल्या आत्म्यासाठी आणि मनासाठी योग्य अशा गोष्टी निवडल्या पाहिजेत.

You might also like