Video : ‘या’ दिवशी भारतात रिलीज होणार डिंपल कपाडिया स्टारर क्रिस्टोफर नोलनचा ‘टेनेट’ !

पोलीसनामा ऑनलाइन – फिल्ममेकर क्रिस्टोफर नोलन (Christopher Nolan) यांचा मोस्ट अवेटेड आणि चर्चित टेनेट (Tenet) या सिनेमाची भारतातील रिलीज डेट घोषित करण्यात आली आहे. बॉलिवूड स्टार डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) हिनंही यात काम केलं आहे. डिंपलनं व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना ही खूश खबर दिली आहे. कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं देशभरातील थिएटर्स बंद असल्यानं हा सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता.

जेव्हा क्रिस्टोफरचा हा सिनेमा लंडनमध्ये रिलीज झाला, तेव्हा बॉलिवू़ड स्टार सोनम कपूर अहुजा (Sonam K Ahuja) आणि हॉलिवूड अ‍ॅक्टर टॉम क्रूज (Tom Cruise) हे सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते. आता दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी भारतात रिलीज होणार आहे.

अ‍ॅक्ट्रेस ट्विंकल खन्ना हिनंही आई डिंपल कपाडियाचा हा व्हिडिओ शेअर करत सर्वांना सिनेमाच्या रिलीजबद्दल सांगितलं आहे.

टेनेट सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर टेनेट हा सिनेमा क्रिस्टोफर नोलन यानं लिहिला आहे. सोबतच त्यानं सिनेमाचं डायरेक्शनदेखील केलं आहे. जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, रॉबर्ट पेटींसन, मायकल केन, डिंपल कपाडिया, हिमेश पटेल, एलिजाबेथ डेबिकी यांनी दमदार अ‍ॅक्टिंग केली आहे. सर्वांत आधी हा सिनेमा ऑगस्टमध्ये यूकेमध्ये रिलीज करण्यात आला होता. हळूहळू हा सिनेमा देशभरात रिलीज करण्यात आला.

You might also like