‘ऑस्कर’ विनर ‘हा’ अभिनेता गेल्या 25 वर्षांपासून स्वत:च कापतोय स्वत:चे केस ! कारण वाचून हैराण व्हाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ऑस्कर विनर जॉर्ज क्लूनी (George Clooney) यानं स्वत:बद्दल मोठा खुलासा केला आहे. हॉलिवूड स्टारचं म्हणणं आहे की, गेल्या 25 वर्षांपासून तो स्वत:चे केस स्वत कापत आहे. एका मुलाखतीत त्यानं हा खुलासा केला जवळपास गेल्या दशका पासून तो स्वत:चे केस स्वत: कापत आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल. परंतु याचं कारणही तसंच आहे. मुलाखतीत बोलताना अभिनेत्याचं याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

क्लूनी यानं याचं कारण सांगताना असं म्हटलं की, माझे केस पेंढा सारखे आहेत. त्यामुळं ते कापणं सोपं नाहीये. मी जास्त चुका करत नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी मी फ्लोबी नावचं यंत्र खरेदी केलं होतं.

पुढं बोलताना क्लूनी म्हणाला, माझे केस कापायला फक्त 2 मिनिटे लागतात. गेल्या 25 वर्षांपासून मी फ्लोबीनंच (केस कापण्याचं एक मशीन) केस कापत आहे असंही क्लूनी म्हणाला.

क्लूनीचे हे वाक्य ऐकल्यानंतर मुलाखत घेणारी देखील हैराण होऊन त्याच्याकडे पहात होती. हे समजल्यानंतर आता चाहतेही चकित झाले आहेत.

You might also like