Coronavirus : ‘कोरोना’विरूध्दचं ‘युध्द’ हारले 70 वर्षाचे जापानी कॉमेडियन केन शिमूरा, टोकियोमध्ये घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन – भारतासोबतच जगभरातील अनेक देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातला आहे. कोरोनाची अनेक नवीन प्रकरणं दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसमुळं जपानचे कॉमेडियन केन शिमूरा यांचं निधन झालं आहे. रविवारी(दि 29 मार्च 2020) सायंकाळी केन शिमूरा यांनी अखेरचा श्वस घेतला. केन शिमूरा 70 वर्षांचे होते.

शिमूरा यांचं खरं नाव नामयासुनोरी शिमूरा असं होतं. 70 आणि 80 च्या दशकात जपानच्या घराघरात त्यांनी काम कमावलं. त्यांनी अनेक पॉप्युलर टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. Hachijidayo Zeninshugo, Tensai ! Shimura Dobutsuen सोबत इतरही मालिकेत काम केलं आहे.

चीनमधून सुरू झालेल्या या कोरोना व्हयरसची लागण झाल्याची अद्याप जगभरातून 7 लाखांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. 30 हजारांहून अधिक लोक यामुळं दगावले आहेत. भारतातही यामुळं 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. 98 लोक यातून बरे झाले आहेत. भारतात बाधितांची संख्या 1000 हून अधिक झाली आहे. कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी पूर्ण देश एकत्र उभा राहिला आहे. 24 मार्च 2020 पासून देशभरात केंद्र सरकारनं 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.