…म्हणून ‘ती’ सुपरस्टार पुर्ण शरीरावर करायची ‘मेकअप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगातील सुपरस्टार किम कर्दाशियां सध्या सोशल मिडियावर खूपच ट्रोल झाली आहे. ती नेहमी सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे बोल्ड फोटो शेअर करुन चर्चेमध्ये येत असते. किम ही एक रियालिटी शोची स्टार आहे. तिला सगळे चांगल्याप्रकारे ओळखतात.

यावेळी किमने दोन नवीन प्रोडक्ट लॉंच केले आहे. पण याला लॉंच करुन ती अडचणीत आली आहे. तिचे पहिले प्रोडक्ट होते एक इनरवियर जे महिलांसाठी प्रायव्हेट असते. बॉडी फिटिंग या ड्रेसला किमने ‘KIMONO’ नाव दिले आहे. या नावामुळे जपानमध्ये खूपच राग निर्माण झाला. ‘किमोनो’ जपानमध्ये घालणारे पारंपारिक वस्त्र आहे. ज्याला जपानी संस्कृतिमध्ये खूप महत्व आहे. किमने या इनरवियरला ‘किमोनो’ नाव दिल्याने जापानी लोकांच्या भावनांना दूखावल्या आहे.

सोशल मिडियावर अनेक मॉडेल्ससोबत किम हे वस्त्र घालून फोटो काढताना दिसली आहे. यामुळे लोकांनी तिला खूप ट्रोल केले आहे. तिच्या दुसऱ्या प्रोडक्टनेही तिला अडचणीमध्ये आणले. किमने आपल्या कंपनीतर्फे एक बॉडी मेकअप रेंज लॉंच केला आहे. किमचा दावा आहे की, या बॉडी मेकअपच्याद्वारे ती तिचे अंगावरचे डाग झाकते. अनेक वर्षे तिचे हे प्रोडक्ट तिच्यासाठी उपयोगी पडत आहे.

अनेक महिलांचे म्हणणे आहे की, इन्फेक्शनचे दाग किंवा स्ट्रेच मार्क्स झाकण्यासाठी याची काय गरज आहे? तुला नॅचरल रहायला खराब वाटते का ? किम कार्दशियन यांच्यावर टीका करताना हॉलीवूड अभिनेत्री जमीला यांनी लिहिले की, जर कोणाला आपल्या त्वचेवरचे रोगाचे डाग झाकायचे असेल. तर ते लज्जास्पद आहे. किम का सांगत नाही की, मेकअप करणे किती धोकादायक असू शकते. बॉडी मेकअप आपल्या शरीराची एलर्जी वाढविते.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक