अवघ्या २१व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने गाठलं ‘हे’ शिखर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॉस्मेटिक्सच्या दुनियेमध्ये पाऊल टाकणारी अमेरिकन सेलिब्रिटी काइली जेनर आता अरबपती बनली आहे. तिने अवघ्या २१ व्या वर्षी ही अचीवमेंट मिळवली आहे. या वयात मुली-मुले करिअरच्या विचारात असतात. काइली २१ व्या वर्षी सेल्फ मेड अरबपतीमध्ये सामिल झाली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग २३ व्या वर्षी अरबपति बनले होते. आता काइली त्यांच्या पुढे गेली आहे.

https://www.instagram.com/p/ByS3dSsnmbg/

काइलीने २०१५ मध्ये ‘काइली कॉस्मेटिक्स’ च्या नावाने कंपनी स्थापन केली होती. काइलीची कंपनीचे ‘लिपस्टिक मैचिंग सेट’ आणि ‘लिप लाइनर’ खुप प्रसिद्ध आहे. सध्या तिच्याकडे ६२४६ करोड रुपये आहेत. तिच्या संपत्तीमध्ये परिवाराच्या बिझनेस आणि रियालिटी शोजचे योगदान आहे.

https://www.instagram.com/p/Bx-9jM-H-Fe/

काइली म्हणते, ‘मला कोणतीच अपेक्षा नव्हती आणि मी भविष्याची कधी चिंता केली नाही पण ही मान्यता माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मला स्वतः वर खूप गर्व आहे.’

https://www.instagram.com/p/BxXt33iHWkB/

काइली सोशल मिडिया स्टार आणि मॉडेल किम कार्दाशियाची बहिण आहे. कार्दाशियां बहिणींचा टिव्ही शो ‘कीपिंग अप विद कार्दाशियां’ खूप प्रसिद्ध झाला होता. या शोमध्ये काइली पण सहभागी होती. या शोनंतर तिला सेलिब्रिटीचा दर्जा मिळाला.

https://www.instagram.com/p/BxJWbn0nk7p/

यानंतर तिने कास्टमेटिक्स दुनियेत प्रवेश केला आणि आपले प्रोडक्ट लॉन्च केले. तिच्या प्रोडक्टची ऑनलाईन खरेदी दिवसेंदिवस वाढत गेली. आता तिचे प्रोडक्ट स्टेटस सिंबलच्या रुपात पाहू शकता.

https://www.instagram.com/p/BpnnsLhlH97/

https://www.instagram.com/p/Bvnf6j-HQip/