Video : मिया खलिफानं समोसा-गुलाब जामुन खाताना शेअर केला व्हिडीओ, ट्रोल करणार्‍यांना दिलं ‘या’ अंदाजात उत्तर

नवी दिल्ली : Ex पॉर्नस्टार मिया खलिफा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता त्याचं कारण आहे तिने ट्विटरवर केलेले ट्विट. या ट्विटच्या माध्यमातून तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. आता हाच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिया खलिफा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. तिने ट्विटवर शेअर केलेल्या व्हिडिओची चर्चा सध्या सुरु आहे. मिया खलिफा ही सध्या शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आहे. ती सातत्याने ट्विट करत आहे. त्यामध्ये तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मिया खलिफा ही भारतीय पदार्थाचा आनंद घेत आहे. जेव्हा ट्रोलर्सकडून तिच्यावर टीका होऊ लागली तेव्हा तिने चांगलेच उत्तर दिले पण तेही अत्यंत प्रेमळ शब्दांत.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी मिया खलिफाने एक ट्विट केले होते. या ट्विटमुळेही तिला ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

काय म्हणाली मिया?

तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर काहीतरी कमावता. असेच मी हे डिनर कमावले आहे आणि हे डिनर मला मिळाले आहे. प्रत्येक कामासाठी काहीतरी किंमत असते. मला माझ्या कामामुळे एक समोसा आणि हे सगळं मिळाले आहे. माझी किंमत समोसा आहे आणि मी समोसासाठी विकू शकते. मी दुसऱ्यांबाबत काहीही बोलू इच्छित नाही. पण मी माझ्याबद्दल सांगेन तर हे माझ्यासाठी पुरेसे आहे.