हॉलीवूडपट ‘किल बिल’ आता  हिंदीत 

  मुंबई : वृत्तसंस्था       

हॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट मालिकांपैकी एक समजला जाणारा हा चित्रपट लवकरच हिंदीत येणार आहे. सुप्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक क्वेन्टिन टॅरँटीनो यांनी दिग्दर्शित केलेली ‘किल बिल’ सीरिज २००३ साली प्रदर्शित झाली होती. बॉलीवूड अभिनेते आणि दिग्दर्शक निखील द्विवेदी यांनी या मालिकेचा हिंदी रिमेक बनविणार  आहेत.

[amazon_link asins=’B07F66CQXF,B077XXRDJM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5b6b5f0f-a52b-11e8-8632-5fe1d43071a4′]

अॅक्शन आणि उत्कृष्ट तलवारबाजीच्या दृश्यांनी जगभरातील प्रेक्षकवर्गात लोकप्रिय झालेल्या मालिकेमध्ये हॉलीवूड अभिनेत्री उमा थर्मनने काम केले आहे . या सीरिजचे डबिंग हिंदीमध्ये होणार नाही, तर या सीरीजचा हिंदी रीमेक बनविला जाणार आहे. किल बिलचे कथानक सूड ह्या विषयावर आधारित असून वधूच्या वेषामध्ये उमा थर्मन लग्नाच्या तयारीमध्ये असताना तिच्या भूतपूर्व गँगमधील माजी सहकारी व त्यांचा म्होरक्या बिल तिला गोळ्या घालतात. ह्या हल्ल्यामधून ती बचावते व सूडाने पेटून बिल व इतर सर्व सहकाऱ्यांसोबत बदला घेते. किल बिलला टीकाकारांनी व प्रेक्षकांनी पसंद केले व हा चित्रपट यशस्वी ठरला होता.

या चित्रपट मालिकेच्या  हिंदी रीमेक मध्ये  उमा  थर्मनने ‘किल बिल ‘ मध्ये साकारलेली भूमिका हिंदी रीमेकमध्ये कोणती अभिनेत्री साकारणार या बद्दल अद्याप नाव निश्चित झाले नाही. या चित्रपटामध्ये उमा थर्मनने अॅक्शन सीन्स दिले आहेत. त्यामुळे उमा थर्मनने दिले तितकेच दमदार अॅक्शन सीन्स आणि उत्तम अभिनय या रीमेक मध्ये देऊ शकेल अश्या अभिनेत्रीचा सध्या निखील द्विवेदी शोध घेत असल्याचे समजते. मात्र नायिकेच्या निवडीबद्दल अजून कोणतेही खात्रीशीर वृत्त प्रसिद्ध झालेले नाही. या हिंदी रीमेकचे चित्रीकरण नक्की केव्हा सुरु होणार आहे, याबद्दलची अधिकृत घोषणाही आतापर्यंत केली गेलेली नाही.