शेखर कपूर यांनी सुरू केली आगामी सिनेमाची तयारी ! ‘ऑस्कर’विजेती ‘ही’ अभिनेत्री करणार अ‍ॅक्टिंग

पोलीसनामा ऑनलाइन – डायरेक्टर शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी सोमवारी घोषणा केली की, त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमासाठीची तयारी सुरू केली आहे. यात अकादमी पुरस्कार विजेता एम्मा थॉम्पसन (Emma Thompson) अ‍ॅक्टिंग करणार आहे.

शेखर यांनी याआधी 2007 मध्ये आय केट ब्लँचेट स्टारर फिल्म एलिजाबेथ द गोल्डन एज या सिनेमाचं डायरेक्शन केलं होतं. शेखर आता दीर्घकाळानंतर या सिनेमाच्या माध्यमातून वापसी करणार आहेत. कपूर म्हणाले की, ते सेंस अँड सेंसिबिलिटीच्या अ‍ॅक्ट्रेस सोबत सिनेमात काम सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत.

74 वर्षीय डायरेक्टरनं ट्विट केलं की, अप्रतिम अ‍ॅक्ट्रेस एम्मा जॅम्पसन सोबत आज पहिली रिहर्सल झाली. म्हणून आता माझ्या आगामी सिनेमात त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. शेखर यांच्या ट्विटनंतर आता चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सध्या त्यांचं ट्विटही सोशलवर चर्चेत आलं आहे.

शेखर कपूर आता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टि्ट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिलचे प्रमुख आहेत. 6 डिसेंबर 1945 रोजी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्मलेले शेखर एलिजाबेथ द गोल्डन एज, बँडिट क्वीन, मिस्टर इंडिया, द फोर फादर्स, मासूम, टूटे खिलौने, इश्क इश्क आणि बिंदीया चमकेगी अशा अनेक हिट सिनेमांसाठी ओळखले जातात.